निवडणूक निकालांच्या कलाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण होत आहे. ताज्या माहितीनुसार, सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला. निफ्टीतही जवळपास १८०० अंकांनी घसरण झाली. त्यामुळे अवघ्या २० मिनिटातच गुंतवणुकदारांचे तब्बल २० हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
निवडणूक निकालानंतर ३ जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानंतर सोमवारी शेअर बाजारात वादळी वाढ झाली होती. कालच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला होता, तर बंदही विक्रमी राहिला.
मात्र, मंगळवारी निवडणूक मतमोजणीला सुरुवात होताच शेअर बाजारात मोठी पडझड झाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ३० मधील जवळपास २७ शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. तर निफ्टीवरील बँक, फायनान्शियल, आयटी, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत.
टॉप गेनर्समध्ये एसबीआय, एनटीपीसी, एलटी, पॉवरग्रीड, रिलायन्स, बाजाज फायनान्स यांचा समावेश आहे. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, ओएनजीसी, लार्सन, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दरम्यान, देशात सत्तापरिवर्तन झाल्यास शेअर मार्कटमध्ये आणखीच मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.