Share Market Crash Saam Tv
बिझनेस

Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी आपटी, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, कोणते १० शेअर ठरले लुझर्स?

share market update : शेअर बाजारात मोठी पडझड दिसली. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळतेय. आज बाजारातील व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी आपटी पाहायला मिळाली. शेअर बाजार सुरु झाल्यापासून बंद होण्यापर्यंत दोन्ही इंडेक्सला उसळी घेता आली नाही. आज सेन्सेक्स ९८४ अंकांपर्यंत घसरला होता. आज रिलायन्स, टाटा, अदानी महिंद्रा कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

शेअर बाजारात मंगळवारसारखी बुधवारी देखील घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स मंगळवारी ७८,६७५.१८ पातळवरून घसरून दुसऱ्या दिवशी ७८,४९५.५३ या स्तरावर सुरु झाला. दुसऱ्या दिवशी ५०० अंकांनी घसरून ७८,१३१.३६ पर्यंत पोहोचला. पुढे हळूहळू बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स १००० अंकांनी घसरून ७७,५५३.३० स्तरापर्यंत पोहोचला. शेअर बाजाराचा व्यवहार संपल्यानंतर ९८४.२३ अंकांनी घसरून १.२५ टक्क्यांनी घसरून ७७,६९० पातळीवर पोहोचला.

दुसरीकडे एनएसई निफ्टीमध्येही घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्ससारखी निफ्टीमध्येही आपटी पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला निफ्टीचा व्यवहार लाल रंगात सुरु झाला. निफ्टी-५० देखील ३७४ अंकांनी घसरला. बाजार बंद झाल्यानंतरही घसरण सुरुच होती. निफ्टी इंडेक्स ३२४.४० अंकांनी म्हणजे १.३६ टक्क्यांनी घसरून २३,५५९.०५ पातळीवर बंद झाला.

दीड महिन्यांपासून बाजारात पडझड

शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवस सोडले तर मागील दीड महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. निफ्टीने ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २६,२७७ पर्यंत म्हणजे १० टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे सेन्सेक्सविषयी बोलायचं झालं तर, उच्चांकी पातळी ८५,९७८ हून ८,२८८ अंकांनी घसरला.

शेअर बाजारात मंगळवारी बीएसई मार्केट कॅपमध्ये ५ लाख कोटी रुपयांहून अधिक घसरणीची नोंद पाहायला मिळाली. बीएसई एमकॅपमध्ये घट होऊन ४.३८ लाख कोटीपर्यंत घसरला. मात्र, आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे ४,३०,३६,०५९ रुपये राहिले.

कोणत्या शेअरमध्ये झाली घसरण?

बुधवारी शेअर बाजारात १० शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. टाटा स्टील (३.४० टक्के), एम अँड एम (३.२३ टक्के), अदानी पोर्ट्स (२.८२ टक्के), एसबीआय (२.१८ टक्के), जेएसडब्लू स्टील (२.१७ टक्के), एचडीएफसी बँक (२.१६ टक्के), इंडसइंड बँक (१.८९ टक्के), कोटक बँक (१.८७ टक्के) रिलायन्स (१.६४ टक्के) इतके शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salim Khan Birthday: तब्बल ११ वर्षांची मैत्री क्षणार्धात तुटली, 'त्या' संध्याकाळी नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: पुणे जिल्ह्यातील कुठल्या आमदाराच्या गळ्यात पडणार पहिल्यांदा मंत्रिपदाची माळ?

Ambarnath Accident CCTV: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार! दुचाकीला धडक देत टेम्पो पलटी, एकाचा जागीच मृत्यू

IPL 2025 Auction: अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या पायावर मारला धोंडा; ऑक्शनच्या काही तास अगोदर हे काय झालं?

Nanded Bypoll Election Result 2024: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांनी डाव पलटला, अशोक चव्हाणांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT