Share Market On Loksabha Election Result Saam TV
बिझनेस

Share Market : शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांनी गमावले कोट्यवधी रुपये; कोणत्या 10 शेअरची झाली घसरगुंडी?

Share Market today : शेअर बाजारात आज शुक्रवारी हाहाकार पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये गमावले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात १३०.५६ अंकांनी उसळी घेऊन ८०,१९५.७२ अंकांवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी ३६.९ अंकांनी उसळी घेऊन २४,४३६.३९ वर पोहोचला. शेअर विक्रीच्या दबावामुळे बाजारात पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्स थेट ८०,००० अंकांच्या खाली घसरला. चार ते पाच तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपये बुडाले.

मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ७९,२०१ अंकापर्यंत पोहोचला. निफ्टी ३०० अंकांनी घसरून २४,०९३ अंकावर पोहोचला. ३० लिस्टेड कंपन्यांपैकी इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांनी घसरण दिसून आली. कंपनीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या लाभात ४० टक्क्यांनी पडझड झाल्याने शेअर दणकून आपटल्याचं दिसून आलं. तर एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टूब्रो,टाटा स्टील आणि जेएसडब्लू स्टीलच्या शेअरचंही नुकसान झालं.

आयटीसीच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांनी उसळी

आयटीसीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या लाभात १.८ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली, त्यानंतर ३ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. एक्सिस बँक , एशियन बँक, एचसीएल टेक्नोलॉजीज, आयसीआयसीआय बँक आणि महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. तर आशियाई बाजाराच्या दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनच्या शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँग हँगसँग फायद्यात दिसला. तर जपानचा निक्की २२५ अंकांनी तोट्यात होता. अमेरिकेच्या बाजार उसळी घेऊन बंद झाला.

कोणते १० शेअर घसरले?

इंडसइंड बँकेचा शेअर १८ टक्क्यांनी घसरला.

हेविवेट शेअरमध्ये महिंद्र अँड महिंद्रा ५ टक्क्यांनी घसरला.

अदानी पोर्ट, एनटीपीसी, एनअँडटी सारखा शेअर ३ टक्क्यांनी घसरला.

डिक्सॉन टेक्नॉलॉजीचा शेअर १० टक्क्यांनी घसरला.

एय स्मॉल फायनान्सचा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.

मँग्लोर रिफायनरीचा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.

BHEL चा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.

टाटा ट्रेटचा शेअर ५.३८ टक्क्यांनी घसरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Final Scenario : टीम इंडियासमोरचा मार्ग काटेरी, पण अशक्य नाही! 'असं' असेल WTC फायनलचं समीकरण!

Maharashtra News Live Updates: ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा: एफआरपीसह एक रकमी ३७०० रुपये पहिली उचल द्या

Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं

Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यवधी; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT