Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं

Sushant Shingh Rajput : सुशांत सिंग राजपूतप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.
Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं
Riya Chakraborty Instagram PostSaam Tv
Published On

अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय. सुप्रीम कोर्टाने CBI च्या लुकआऊट सर्कुलरला रद्द केलंय. सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि वडील यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियानी त्याच्या मृत्यूनंतर त्याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी पाटनामध्ये एफआयआर दाखल केली होती. त्यानतंर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. दरम्यान मुंबई उच्च न्यायालायने जारी केला लूक ऑऊट सर्कुलर हा काय असणार आहे. एवढेच नाही तर सीबीआयचे अपीलही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि वडील यांच्याविरुद्ध सीबीआयने जारी केलेल्या लूक आऊट परिपत्रकाच्या प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवलाय.

Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं
Hya Goshtila Navach Nahi: 'लाईफ म्हणजे नुसता गोंधळ' तारूण्यातल्या भावविश्वाची झलक दाखविणारं नवं गाणं प्रदर्शित

सीबीआयला खडसावलं

या प्रकरणाच्या सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला खडसावले आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई म्हणाले, आरोपींपैकी एक उच्चभ्रू व्यक्ती आहे म्हणून तुम्ही ही फालतू याचिका दाखल करत आहात. यासाठी तुम्हाला मोठी किमत फेडावी लागेल. या प्रकरणाचे मूळ समाजात खोलवर दडली आहेत. सीबीआय दंड आणि काही कोठर टिप्पणी करू इच्छित असेल तर त्यांनी या प्रकरणात वाद-विवाद केला पाहिजे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सीबीआयकडून आव्हान

न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांनी सीबीआयने एलओसी जारी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. फेब्रुवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि वडील यांच्या याचिकेवर सीबीआयचे लुक आउट परिपत्रक रद्द केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने लूक आऊट सर्क्युलर जारी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com