SBI Scheme Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ४०० दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी वाढवला

Siddhi Hande

भारतातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने २ योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी अमृत वृष्टी योजना सुरु केली होती. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ होती. मात्र, या योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

अमृत वृष्टी योजनेत गुंतवणूकीचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेचा गुंतवणूकीचा कालावधीदेखील ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या दोन्ही योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अमृत कलश योजना (SBI Amrut Kalash Yojana)

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश ही स्पेशल एफडी स्कीम आहे. या योजनेत गुंतवणूकीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ होती. ही वाढवून ३१ मार्च २०२५ करण्यात आली आहे. बँकेतील या योजनेत ७.१० टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर मिळते. स्टेट बँक ऑउ इंडियाची ४०० दिवसांची एफडी आहे. त्यात सामान्य व्याजापेक्षा जास्त व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याला व्याज मिळते.या योजनेत जर तुम्ही मॅच्युरिटीआधी पैसे काढले तर ०.५० ते १ टक्के कमी व्याजदर दिले जातात.

SBI अमृत वृष्टी योजना (SBI Amrit Vrushti Yojana)

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी ही एफडी योजना आहे. ही योजने १५ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या योजनेत ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत तुम्हाला ७.२५ टक्के व्याजदर मिळते.या योजनेत तुम्हाला दर वर्षी व्याज दिले जाते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्त व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही २५ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Headlines: माजी गृहराज्यमंत्र्याची शिवीगाळ, नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील औषधे बनावट; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Onion Crops : घोषणांचा नुसताच पाऊस; दीड वर्षांपूर्वीचे 24 कोटी मात्र अद्याप रखडलेले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी?

Pune Helicopter Crash: हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे... उड्डाणानंतर ४ मिनिटांत कोसळलं, अपघात नेमका कसा झाला?

Gold Silver Price: सोने-चांदी ऐन सणासुदीत महागले; सोने ७७ हजारांच्या पार; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Palghar Tourism Place: हिरवागार निसर्ग अन् मनमोहक नजारा पाहण्यासाठी मुंबईजवळील या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT