Amrut Kalash Yojana Saam Tv
बिझनेस

Amrut Kalash Yojana: फक्त ४०० दिवस गुंतवणूक करा अन् लाखो रुपये कमवा; SBI ची अमृत कलश योजना नक्की आहे तरी काय?

SBI Amrut Kalash Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी अमृत कलश योजना राबवली आहे. अमृत कलश योजनेत ४०० दिवस गुंतवणूक करायची असेल. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.

Siddhi Hande

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. नागरिकांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक बचत योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना फक्त ४०० दिवसांसाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ४०० दिवसांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी आता संपणार आहे.

एसबीआय अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. या योजनेची सुरुवात एप्रिल २०२३ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत.

अमृत कलश एफडी योजनेत तुम्हाला ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर दिले जाणार आहे. हे व्याजदर नियमित व्याजदरापेक्षा ३० बेसिस पॉइंट्सने जास्त आहे.

४०० दिवसांच्या अमृत कलश योजनेत भारतीय आणि NRI नागरिक दोघेही अर्ज करु शकतात. यात डिपॉझिट आणि रिन्यू अशा दोन्ही योजनांचा समावेश आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा कमी गुंतवणूकीवर टर्म डिपॉझिट लागू करतात.

या योजनेत ग्राहक मासिक, तिमाही आणि सहा महिन्यांच्या आधारे व्याज दिले जाते. टर्म डिपॉझिटवर मॅच्युरिटीच्या वेळी व्याजदर दिले जाते. मॅच्युरिटीनंतर ग्राहकांचे टीडीएस कापल्यानंतर हे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होतात.

टॅक्स सवलत

या योजनेत आयकर कायद्यानुसार टीडीएस कापला जातो. टीडीएसमध्ये सूट हवी असेल तर तुम्हाला फॉर्म 15G/15H जमा करावा लागेल. याचसोबत या योजनेत लोन सुविधादेखील दिली जाते.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योने अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन बुकींग करु शकतात. या योजनेत ३० सप्टेंबर २०२४ च्या गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT