Get rid of loan and credit card spam calls using the government DND app 
बिझनेस

Spam Calls: वारंवार येणाऱ्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्समुळे वैतागलात ? मग 'हे' अॅप आताच डाउनलोड करा

Block Loan Calls: जर तुम्हालाही बँक किंवा कर्जाचे सतत कॉल येत असतील आणि त्यापासून सुटका हवी असेल, तर सरकारी अ‍ॅपद्वारे तुम्ही स्पॅम कॉल्सपासून सहज मुक्त होऊ शकता.

Dhanshri Shintre

  • कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्सपासून मुक्तता मिळवण्यासाठी सरकारी DND अ‍ॅप वापरा.

  • अ‍ॅप डाउनलोड करून तुमचा नंबर नोंदवा आणि कॉल ब्लॉकिंग सेटिंग्ज करा.

  • फसवणूक कॉल किंवा एसएमएस आले तर अ‍ॅपवरून तक्रार नोंदवा.

  • DND TRAI अ‍ॅप Android आणि iOS दोन्हीवर मोफत उपलब्ध आहे.

दिवसभर बँक, कर्ज किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित प्रमोशनल कॉल्स येत असल्याने तुम्ही हैराण झाला असाल, तर आता त्यापासून सुटका मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ने तयार केलेल्या DND (Do Not Disturb) अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही या स्पॅम कॉल्सवर कायमचे सुटका मिळवू शकता. ही एक सरकारी सेवा असून, प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून DND TRAI अ‍ॅप मोफत डाउनलोड करता येते.

हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला केवळ काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही ज्या नंबरवर प्रमोशनल कॉल्स येतात त्या नंबरसाठी DND सेवा अ‍ॅक्टिव्ह करता येते. एकदा ही सेवा सुरू केली की, बँक, कर्ज, क्रेडिट कार्ड, विमा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रमोशनल कॉल्स थांबतील. हा अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पुढील कृती करा.

कृती १

फोन नंबर आणि ओटीपीच्या सहाय्याने अ‍ॅपमध्ये सहज लॉगिन करा.

कृती २

यानंतर एक डॅशबोर्ड उघडेल, ज्यामध्ये तुम्ही विविध पर्याय निवडून आवश्यक ती कृती करू शकता.

कृती ३

सर्वप्रथम, चेंज प्रेफरन्स वर टॅप करून तुम्ही कोणते कॉल्स स्वीकारायचे ते निवडू शकता.

कृती ४

DND विभागात तुम्ही Fully Block पर्यायातून बँकिंग, विमा, रिअल इस्टेट, शिक्षणासारखे प्रमोशनल कॉल्स थांबवण्यासाठी श्रेणी निवडू शकता.

कृती ५

यानंतर DND श्रेणीतील निवडलेल्या पर्यायांसाठी तुम्ही कॉल्स किंवा एसएमएस ब्लॉक करण्याचा पर्याय निवडू शकता.

कृती ६

यानंतर, तुम्ही कॉल्स कधी स्वीकारायचे आणि कधी टाळायचे हे वेळेनुसार सेट करू शकता.

कृती ७

शेवटी, तुम्ही कॉल्स कोणत्या वेळेत स्वीकारायचे आणि कोणत्या वेळेत टाळायचे ते ठरवू शकता.

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही स्पॅम कॉल्सपासून मुक्तता मिळवू शकता. फसवणूक कॉल किंवा एसएमएस आले तर अ‍ॅपवरून थेट डीओटी वेबसाइटवर तक्रार नोंदवू शकता. तसेच, व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणुकीचे संदेश किंवा कॉल आल्यासही येथे तक्रार करता येते. त्यामुळे हा अ‍ॅप फोन कॉलशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यात उपयुक्त आहे.

वारंवार येणाऱ्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्सपासून कशी सुटका मिळवू?

तुम्ही सरकारी DND TRAI अ‍ॅप वापरून या कॉल्स ब्लॉक करू शकता.

कॉल्स ब्लॉक झाल्यावर मला फसवणूक कॉल्सची तक्रार कशी करायची?

अ‍ॅपमध्ये फ्रॉड कॉल/एसएमएस सेक्शनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता.

हा अ‍ॅप कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे?

DND TRAI अ‍ॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Threat : भाजप नेत्यापासून मला आणि माझ्या आईचा जीवाला धोका; अभिनेत्रीने रडत रडत केली पोलिसांची पोलखोल

Maharashtra Live News Update : सिंहगडावर दोन दिवसांत १५ हजारांपेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी

Flood Viral Video: डोक्यावर बाळ अन् मागे बायको; पुरातून वाट काढत जाणाऱ्या बापाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Actress File Cyber Case: ७ महिन्यांच्या मुलाविरोधात निगेटिव्ह कमेंट्स; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री संतापली, थेट पोलिसात केली तक्रार दाखल

Bel Leaves: महादेवाला बेलाची पान का वाहतात?

SCROLL FOR NEXT