Small Savings Scheme Saam TV
बिझनेस

Small Savings Scheme: आनंदाची बातमी! अल्पबचत योजनांच्या ठेवीवरील व्याजदरात मोठी वाढ, मिळणार बक्कळ नफा

Small Savings Scheme Interest Rates Revised: एकून ३० bps पर्यंत वाढ करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने ३० जून २०२३ रोजी याबाबत घोषणा केली आहे.

Ruchika Jadhav

Small Savings Scheme: लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. एकून ३० bps पर्यंत वाढ करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने ३० जून २०२३ रोजी याबाबत घोषणा केली आहे. (Latest Small Savings Scheme News)

सरकारने यामध्ये PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना SSY, किसान विकास पत्र KVP, NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

जाहीर केलेल्या सुधारित दरांतर्गत, १-वर्ष, २-वर्षाच्या मुदत ठेव योजनेत १० bps ची वाढ करण्यात आली आहे. तर ५ -वर्षांच्या आवर्ती ठेव योजनांमध्ये ३० bps ची वाढ करण्यात आलीये. तुमच्या १ वर्षांच्या ठेवी योजनेवरील व्याजदर ६.९ टक्के, तर २ वर्षांच्या ठेव योजनेवरील व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याजदर ६.५ टक्के आहे.

नव्या दरांनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दर वाढला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७ टक्के आहे. तर किसान विकास पत्र ७.५ टक्के व्याजदरावर आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत व्याज दर ८.२ टक्के आणि सुकन्या समृद्धी या लोकप्रिय योजनांचे दर ८ टक्के करण्यात आले आहे.

नवे दर केव्हापासून होणार लागू

सर्व नवे व्याजदर १ जुलैपासून लागू होणार आहेत. सरकारने दिलेल्या या योजना इतर योजनांपेक्षा सर्वाधिक सुरक्षित आहेत. यावर व्याजदरही उत्तम मिळतो. अशात आता वित्त मंत्रालयाने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केल्याने अनेक नागरिकांची या बचत योजनांना पसंती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना सारखं ग्लॅमरस दिसायचं आहे? मग कारा 'या' फॅशन टिप्स फॉलो

Maharashtra Live News Update: बनावट ऑनलाईन अ‍ॅप प्रकरणात चौकशीत नसतानाही शेटे यांचे आत्महत्येचं पाऊल

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT