SIP Calculator google
बिझनेस

SIP Calculator: फक्त महिना २०,००० रुपयांमध्ये होऊ शकता ₹१ कोटीचे मालक, ते कसं आणि किती वर्षांत?, जाणून घ्या

Mutual Fund Investment Tips : महिन्याला फक्त २०००० रुपयांची SIP करून १२ टक्के वार्षिक परताव्याच्या आधारावर जवळपास १६ वर्षात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करता येतो.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या काळात महागाई ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूक करणे अत्यंत महत्वाचं झालं आहे. अनेकांना भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करायची असते. पण त्यासाठी मोठी रक्कम गुंतवावीच लागते असं नाही. योग्य नियोजन आणि संयम ठेवून महिन्याला फक्त २०००० रुपयांची सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) करूनही १ कोटी रुपयांचा फंड जमा करता येऊ शकतो.

SIP केल्याने काय फायदा होतो?

म्युच्युअल फंडातली SIP केल्याने भविष्यात मोठी रक्कम जमा करता येते. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाते. बाजारातला चढ उतारांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होतो आणि काही कालावधीत कंपाउंडिंगचा मोठा फायदा तयार होईल.

२० हजारांच्या SIP मधून १ कोटी कसा तयार होईल?

समजा एखादा गुंतवणूकदार महिन्याला २०००० रुपये SIP मध्ये गुंतवतो आणि त्याला १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो. अशा परिस्थितीमध्ये जवळपास १६ वर्षांत त्याचा फंड १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो.

मासिक गुंतवणूक: २०००० रुपये

गुंतवणुकीचा कालावधी: १६ वर्षे

एकूण गुंतवणूक: ३८.४० लाख रुपये

अंदाजे वार्षिक परतावा: १२%

अंदाजे नफा: ७०.७६ लाख रुपये

मॅच्युरिटी रक्कम: सुमारे १.०९ कोटी रुपये

हे कॅल्युलेशन कंपाउंडिंगवर आधारित आहे. यात परतावा बाजारातल्या परिस्थितीनुसार कमी किंवा जास्त असू शकतो.

लवकर सुरुवात करणे का महत्त्वाचे?

गुंतवणुकीत वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. जितक्या लवकर SIP सुरू केली जाईल, तितका जास्त काळ तुमच्या पैशाला वाढण्यासाठी मिळतो. काही वर्षांचा उशीर झाला तर 1 कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी जास्त वर्षे लागू शकतात.

टीप : कोणतीही गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा साम टिव्ही करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT