Share Market  Saam Tv
बिझनेस

Share Market: इराण- इस्त्रायल युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम; सेन्सेक्स तब्बल ५०७ अंकानी गडगडला

Share Market Update 16th April 2024: इराण- इस्त्रायल युद्धाचा फटका भारतीय शेअर मार्केटवर होत आहे. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण कायम आहे. मागील काही दिवसांपासून बीएसई-एनएसईमध्ये घसरण सुरुच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इराण- इस्त्रायल युद्धाचा फटका भारतीय शेअर मार्केटवर होत आहे. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण कायम आहे. मागील काही दिवसांपासून बीएसई (BSE)-एनएसईमध्ये (NSE) घसरण सुरुच आहे. आज सकाळी सेन्सेक्समध्ये 507 अंकानी घसरण झाली आहे. सेनसेक्स 72892 च्या पातळीवर उघडला आहे.

सेन्सेक्समधील जवळपास २८ स्टॉक्स घसरणीसह उघडले आहेत. बजाज फिनसर्व्ह, मारुती, कोटक बँक (Kotak Bank), विप्रो (Wipro), एचसीएल टेक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, टायटन, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. फक्त टाटा स्टील आणि एनटीपीसी कंपन्याचे शेअर्स चांगल्या अंकावर व्यापार करत आहेत.

इराण- इस्त्रायलच्या तणावाचा परिणाम सेनसेक्स (Sensex) आणि निफ्टीवर (NIFTY) होताना दिसत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. आज गिफ्ट निफ्टी जवळपास 22,185 अंकावर व्यव्हार करत आहे. हे निफ्टी फ्युचर्सच्या तुलनेत 180 अंकानी घसले आहेत.

इराण- इस्त्रायल युद्धाचा परिणाम आशियाई बाजारावरदेखील झालेला दिसत आहे. जपानचा नेक्केई (nikkei) 225 1.5 टक्क्यांनी घसरला आहे तर टॉपिक्स (Topix) 1.04 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.31 टक्के तर कोस्डॅत 0.86 अंकानी घसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT