लवकरच वर्षातील दुसरा महिना सुरु होईल. या महिन्यात बजेट देखील मांडले जाणार आहे. काही दिवसांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.
अशातच बजेटपूर्वी शेअर मार्केटने (Share Market) भरारी घेतली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार (Market) उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. बीएसईच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सने ६०० हून अधिक अंकांनी झेप घेतली, तर एनएसईच्या निफ्टीनेही १५० हून अधिक अंकांनी उसळी घेतली.
1. सेन्सेक्सने ६२७ अंकांनी उसळी
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह ७०,९६८.१० च्या पातळीवर उघडल्यानंतर वाढ दिसून आली. ट्रेडिंगच्या (Trending) काही मिनिटांत त्याने ६२७.६४ अंकांची किंवा ०.८९ टक्क्यांची मोठी झेप घेतली. सकाळच्या सुमारात ७१,३२८.३१ च्या पातळीवर पोहोचला. यापूर्वी २५ जानेवारीला तो ७०,७००.६७ च्या पातळीवर बंद झाला होता.
2. निफ्टीमध्ये वाढ
बीएसईच्या सेन्सेक्सप्रमाणेच शेअर बाजाराचा दुसरा प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्येही जोरदार वाढ झाली. निफ्टी १२४.९० अंकांनी ०.५८ टक्क्यांनी उघडला आणि १७७.४५ अंकांच्या ०.८३ टक्क्यांच्या वाढीसह सकाळी २१,५३० वर पोहोचला. मागच्या आठवड्यात निफ्टी २१, ३५२ वर बंद झाला.
3. BSE वर हे शेअर तेजीत
BSE वर ३० पैकी २५ शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. यामध्ये सर्वात मोठी वाढ सन फार्माच्या समभागात दिसून आली आहे. २.७७ टक्क्यांनी वाढतो आहे. याशिवाय पॉवरग्रिड (2.32 टक्के), कोटक बँक (2.30 टक्के), ICICI बँक (1.83 टक्के), NTPC (1.81 टक्के), अॅक्सिस बँक (1.63 टक्के)आणि रियालन्स (1.57 टक्के)वधारत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.