Share Market Saam Tv
बिझनेस

Share Market: टॅम्प यांच्या टॅरिफचा धसका, शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स-निफ्टी धडाम

Trump 50 Percent Tariff Fear: अमेरिकेने भारताच्या उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. याचा परिणाम आज शेअर मार्केट उघडताच पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

Priya More

Summary -

  • ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम.

  • सेन्सेक्स ६२९ अंकांनी घसरला, ८१,००० खाली.

  • निफ्टी २०० अंकांनी घसरून २४,८०० खाली गेला.

  • गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या धडामधूडला टॅरिफ कारणीभूत आहे. आज सकाळी शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीवर मोठा परिणाम दिसून आला. यासोबत अनेक मोठ्या कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले होते आणि रशियन तेल खरेदीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क जाहीर केले होते. ते २७ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे भारतावरील एकूण शुल्क आता ५० टक्के झाले आहे. याचा परिणाम आता शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहे. शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने तीव्र घसरणीने सुरूवात केली. तर बीएसई सेन्सेक्स ६२९ पेक्षा जास्त अंकांनी घसरला. एनएसई निफ्टी २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला.

मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार घसरणीने सुरू झाला आणि मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक ८१,३७७.३९ वर उघडला. त्यानंतर घसरण आणखी वाढली. अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ६३० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८१,००० च्या खाली आला आणि ८०,९४७ वर ट्रेड करताना दिसला.

निफ्टी निर्देशांकावरही टॅरिफचा असाच काहीसा परिणाम दिसून आला. शेअर मार्केट उघडताच निफ्टी २४,८९९.५० वर उघडल्यानंतर एनएसई निर्देशांक त्याच्या मागील बंद २४,९६७.७५ वरून घसरला आणि अचानक २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि २४,७६३ वर ट्रेड करताना दिसला. टॅरिफच्या परिणामांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स अचानक घसरले.

शेअर बाजाराच्या खराब सुरुवातीदरम्यान सुमारे १०३६ कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वाढीसह उघडले. तर १२०७ कंपन्यांचे शेअर्स मागील बंदच्या तुलनेत घसरणीसह लाल रंगात उघडले. याशिवाय १५१ कंपन्यांचे शेअर्स फ्लॅट ओपनिंगमध्ये होते. म्हणजेच त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा बदल दिसून आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

University Exam Fee Hike: विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २०टक्क्यांनी वाढ

Maharashtra Live News Update: आयुष कोमकर हत्या प्रकरण; ३ महिलांना न्यायालयीन कोठडी, तर सर्व पुरुष आरोपींना पोलीस कोठडी

Maharashtra Tourism : ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील बेस्ट किल्ला, मित्रांसोबत 'या' ठिकाणी वीकेंड प्लान करा

SCROLL FOR NEXT