Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market Today : शेअर बाजारात मोठी घसरण; 5 मिनिटांत 5 लाख कोटी स्वाहा, अचानक काय घडलं?

Share Market Latest news : आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज गुंतवणूकदारांचे 5 मिनिटांत 5 लाख कोटी स्वाहा झाल्याचं दिसून आलं. नेमकं अचानक काय घडंल? वाचा

Vishal Gangurde

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स ३१९ अंकांनी घसरून ७७,१८६ पातळीवर बंद झाला. तर निफ्टी २३,२६१ पातळीवर स्थिर झाला. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.

बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.८९ टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. स्मॉलकॅप इंडेक्स १.७७ टक्क्यांनी घसरला. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ५ मिनिटांत ५ कोटी स्वाहा झाले. सर्वाधिक घसरण ही कॅपिटल गुड्स, रियल्टी,पॉवर, मेटल आणि इंडस्ट्रियल्सच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी कॅनडा, मॅक्सिको आणि चीनसाठी नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. कॅनडा आणि मॅक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लागू केला आहे. चीनवर १० टक्के ड्यूटी लावण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या घोषणाबाजीमुळे जागतिक व्यापारातील समीकरण बदललं आहे. कॅनडा आणि मॅक्सिकोने यानंतर प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेत या निर्णयाला आव्हान देऊ अशी भूमिका चीनने घेतली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये ३ फेब्रुवारी रोजी मोठी विक्री पाहायला मिळाली. त्यामुळे सेक्टोरल इंडेक्समध्ये २.३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. सरकारच्या बजेटमुळे भांडवली खर्चात किरकोळ वाढ दिसून आली. आज शेअर बाजारात एल अँड टीच्या शेअरमध्ये ४.४२ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. देशाची सर्वात मोठी सिमेंट कंपनी अल्ट्राटेकच्या शेअरमध्ये २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर डॉलरच्या तुलनेत आशियाई चलनाच्या मुल्यात घसरण पाहायला मिळाली. भारतीय रुपया पहिल्यांदा ८७ रुपये प्रती डॉलरच्या पातळीवरून खाली घसरल्याचं दिसून आलं. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअर बाजारात दबाव पाहायला मिळाला. एक फेब्रुवारी रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १,३२७.०९ कोटी रुपयांचे शेअरची विक्री झाली. याआधी जानेवारी महिन्यात एकूण ८७,३७४.६६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT