Share Market Today Google
बिझनेस

Share Market Today: अमेरिकेचा निर्णय अन् भारतीय शेअर बाजारात तेजी, इतिहासात प्रथमच सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावर

Share Market Today Opening: शेअर मार्केटची सुरुवात आज चांगली झाली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये चांगली वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोज सकाळी गुंतवणूकदारांचे शेअर मार्केटमध्ये लक्ष असतं. सकाळी ९ वाजता शेअर मार्केट उघडताच आज सेनसेक्स आणि निफ्टी दोघांनीही उच्चांक गाठला आहे. आज सकाळी शेअर मार्केट उघडताच सेनसेक्स ७२४ अंकांच्या वाढीसह ८३६७४ वर पोहचला आहे. तर निफ्टीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. निफ्टी २०१ अंकाच्या वाढीसह २५५७९ वर पोहचला आहे.

सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. सेनसेक्स आज सकाळी साडेनऊ वाजता ८३५८६ वर व्यव्हार करत होते. तर निफ्टी १८१ अंकाच्या वाढीसह २५५५८ वर व्यव्हार करत आहे. सेनसेक्समध्ये बजाज फिनसर्वचे (Bajaj Fineserv) स्टॉक्स सर्वाधिक व्यव्हार करताना दिसत आहे.

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाल्याचे दिसत आहे. सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.

BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप ३.०९ लाख रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. सेनसेक्सवरील ३० शेअर्समधील २९ शेअर्स ग्रीन झोन म्हणजे वाढले आहेत.

यूएसमधील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होत आहे. पॉलिसी रेट ५० बेस पॉइंट्सने कमी झाले आहे. यानंतर यूएसमधील व्याजदर ५ टक्क्यांनी खाली आले होते. (Share Market)

आज कोणते शेअर्स तेजीत?

एनटीपीसी (NTPC), टेक महिंद्रा (Tech Mahindra), टिसीएस(Tata Shares), सनफार्मा (Sunpharma Shares), अॅक्सिस बँक (Axis Bank), आयटीसी, मारुती, एशियन पेंट्स (Asian Paints ), एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

SCROLL FOR NEXT