PF Interest: 7 कोटी PF खातेदारांच्या कामाची बातमी, व्याजाची रक्कम या महिन्यात होणार जमा?

Interest On PF Will Deposit On This Day: कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यात येणार आहे.
PF Interest
EPFO Saam Tv
Published On

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते हे असतेच. पीएफ खात्यात कर्मचारी आण कंपनी काही टक्के रक्कम दर महिन्याला जमा करत असतात. पीएफ खात्यातील पैसे ही एक प्रकारची गुंतवणूकच असते. यापीएफच्या पैशांवर सरकार चांगले व्याज देते.

देशभरातील ७ कोटी लोक पीएफ खातेधारक आहेत. तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही सोप्या पद्धतीने चेक करु शकतात. पीएफ खात्यावर व्याजदर कधी मिळणार आहे याबाबत ईपीएफओ लवकरच माहिती देणार आहे. ईपीएफओ १६ सप्टेंबरपर्यंत घोषणा करु शकते. (PF Interest)

PF Interest
PPF Scheme: 'ही' सरकारी योजना बनवेल तुम्हाला करोडपती, 12,500 रुपये गुंतवल्यानंतर मिळणार एवढी मोठी रक्कम; वाचा...

पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीआधी येऊ शकतात.जर २६ जानेवारीआधी व्याजाचे पैसे जमा झाले तर पीएफ कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे आहेत त्यावर तुम्हाला व्याज मिळते.

जर तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये १ लाख रुपये असतील तर तुम्हाला ८.२५ हजार रुपये व्याज मिळेल. म्हणजे १ लाखाव ८.२५ टक्के व्याजदर मिळते. जर तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये २ लाख रुपये असतील तर तुम्हाला १६५०० रुपये व्याज म्हणून मिळतील. जर तुमच्या अकाउंटमध्ये ३ लाख रुपये असतील तर २५ हजार रुपये व्याज म्हणून मिळते. जर चार लाख रुपये तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये असतील तर तुम्हाला ३३,००० रुपये व्याज मिळेल. (Interest On PF)

PF Interest
Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे आलेत की नाही कसे चेक करावे

पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे जमा झालेत की नाही हे चेक करण्याची सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर पीएफ खात्यातील बॅलेंसचा मेसेज येईल.

PF Interest
Post Office Scheme: फायदाच फायदा, पोस्ट ऑफिसच्या १० जबरदस्त योजना! तुम्ही कुठे गुंतवणूक केली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com