Stock Market Yandex
बिझनेस

Share Market Opening : शेअर बाजारात जबरदस्त उसळी; सेन्सेक्स ७६९०० पार, 'या' कंपन्या ठरल्या गेनर

Vishal Gangurde

मुंबई : भारतीय शेअर बाजारात दिवसाची सुरुवात उसळीने सुरुवात झाली आहे. बीएसईच्या सेन्सेक्सने १०१.४८ अंकानी म्हणजे ०.१३ टक्क्यांनी उसळी घेतली. यामुळे सेन्सेक्स ७६९०० वर पोहोचला आहे. तर निफ्टीने ६६.०५ अंकांनी उसळी घेतली आहे. निफ्टी २३,४६४ अंकावर पोहोचला आहे.

सेन्सेक्सच्या ३० शेअरमध्ये ७ शेअर चांगल्या स्थितीत व्यवहार करत आहे. तर इतर २३ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तर टोप गेनर्सनेही चांगली पाहायला मिळाली नाही.

अल्ट्राटेक सीमेंट ०.५९ टक्के, टायटन ०.५३ टक्के, एशियन पेंट्स ०.२५ टक्के, एम अँड एम ०.२३ आणि एचयूएल ०.२१ टक्क्यांनी उसळी घेतली. तर काही शेअर घसरणही पाहायला मिळाली.

टेक महिंद्रामध्ये १.४५ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. एनटीपीसी ०.८४ टक्के तर ०.८१ टक्क्यांहून कमी गेला आहे. कोटक महिंद्रा बँकेने ०.७२ टक्क्यांनी घसरला आहे.

निफ्टीमध्ये आज सर्वात अधिक रियल्टी स्टॉक्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. रियल्टी स्टॉक्समध्ये एक टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळत आहे. कंज्यूमर ड्यूरेबल्समध्येही ०.९१ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. आयटी स्टॉक्समध्येही घसरण पाहायला मिळाली. आयटी स्टॉक्स ०.८४ टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँकमध्ये ०.२४ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त ऑटो, फायनान्शिअल सर्विेसेज आणि खासगी बँक क्षेत्र रेड झोनमध्ये आहेत.

बीएसई मार्केट कॅपने उसळी घेत ४३२.५० लाख कोटीपर्यंत पोहोचला आहे. बीएसईवर 3246 शेअर ट्रेड होत आहे. त्यातील १९७१ शेअरने उसळी घेतली आहे. तर ११६० शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर ११५ शेअर हे स्थिर आहेत.

टॉप गेनर - अदानी पोर्ट्स, श्रीराम फायनान्स, ग्रॅसिम, बीपीसीएल, एम अँड एम

टॉप लूसर्स - टेकएम , एचसीएलटेक, टीसीएस, विप्रो, डॉ.रेड्डी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT