D. Development IPO : 'डी डेव्हलपमेंट'चा आयपीओ १९ ते २१ जूनदरम्यान, किती आहे किंमत? जाणून घ्या

D. Development IPO : डी डेव्हलपमेंट इंजीनियरिंग लिमिटेड च्या आयपीओ साठी १९३ ते २०३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. या शेअरची विक्री बुधवार १९ जून ते शुक्रवार २१ जून दरम्यान खुली राहील.
D. Development IPO
D. Development IPOSaam Digital

डी डेव्हलपमेंट इंजीनियरिंग लिमिटेड च्या आयपीओ साठी १९३ ते २०३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. या शेअरची विक्री बुधवार १९ जून ते शुक्रवार २१ जून दरम्यान खुली राहील. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या बोलीसाठी मंगळवार १८ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

D. Development IPO
GST Council Meeting: जीएसटी परिषदेची २२ जून रोजी महत्त्वाची बैठक ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार का?

या इशू मध्ये गुंतवणूकदारांना किमान ७३ इक्विटी शेअर साठी व त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असल्यास ७३ इक्विटी शेअर च्या पटीत बोली लावता येईल. या इशू मधील काही भाग कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असून त्यांना प्रतिशेअर १९ रुपये सवलत मिळेल. कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतचे शेअर राखीव आहेत.

इशू मधून मिळालेल्या रकमेपैकी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ७५ कोटी रुपये कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरले जातील. तर यापूर्वी कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी १७५ कोटी रुपये वापरले जातील. उरलेली रक्कम कंपनीच्या सर्वसाधारण गरजांसाठी वापरली जाईल.

D. Development IPO
GST Council Meeting: जीएसटी परिषदेची २२ जून रोजी महत्त्वाची बैठक ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार का?

हे शेअर बीएससी व एनएसई वर नोंदवले जातील. बड्या पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी पन्नास टक्के शेअर उपलब्ध असतील. त्यातील काही भाग म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, १५ टक्के शेअर बड्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना तर पस्तीस टक्के शेअर छोट्या गुंतवणूकदारांना मिळतील. गुंतवणूकदारांनी ए. एस. बी. ए. प्रक्रियेमार्फतच गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com