Share Market Trading Muhurta Saam Tv
बिझनेस

Share Market Trading Muhurta : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे कमावण्याची संधी; शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग कधी?

Special Trading Session : दिवाळीत शेअर बाजारात दिवाळीच्या निमित्ताने विशेष ट्रेडिंग सत्र पार पडते.

कोमल दामुद्रे

Share Market :

दिवाळी म्हटंल की, दिव्यांची आरास, रोशनाई, फटाके आणि चमचमीत पदार्थ खायला मिळतात. दिवाळी या सणाला धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे तितकेच आर्थिकदृष्ट्याही महत्त्व आहे. दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो.

या सणात अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतात तर काही शेअर बाजारात गुंतवणूक करतात. या काळात शेअर बाजारात दिवाळीच्या निमित्ताने विशेष ट्रेडिंग सत्र पार पडते. परंतु, दिवाळीनिमित्त शेअर बाजारातील व्यवहार सुट्टीमुळे बंद असतात. मात्र दिवाळीत एका दिवासासाठी शेअर बाजारात आपण भरघोस कमाई करु शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या काळात गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग करतात. शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्यास वर्षभर गुंतवणूक चांगली राहाते. जर तुम्हालाही लक्ष्मी पूजनाला (Lakshmi Pujan) पैसे कमवायचे असेल तर तारीख आणि वेळ लक्षात ठेवा.

1. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ (Time)

NSE ने दिलेल्या माहितीनुसार शेअर बाजारात १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ ते ७.१५ या वेळेत ट्रेडिंग करता येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग सत्रात प्री- ओपनिंग, ब्लॉक डील विंडो तर सामान्य गुंतवणुकदारांसाठी बाजार (Market) ओपन असणार आहे.

2. मुहूर्त ट्रे़डिंगची वेळ

  • ब्लॉक डिल सेशन - संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत

  • प्री-ओपनिंग सेशन- संध्याकाळी ६ ते ६.०८ वाजेपर्यंत

  • नॉर्मल मार्केट - संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत

  • कॉल ऑक्शन सेशन - संध्याकाळी ६.२० ते ७.०५ वाजेपर्यंत

  • क्लोजिंग सेशन- संध्याकाळी ७. १७ ते ७. २५ वाजेपर्यंत

या काळात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ट्रेडिंगचा मुहूर्त असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चांगली गुंतवणूक करुन विशेष परतावा मिळवू शकतात. या दिवशी एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात तेजी कायम राहाण्याची शक्यता आहे. मुहूर्त सुरु होण्याआधी शेअर बाजारात गणेश-लक्ष्मी पूजन होते. यंदा मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स ६० हजार अंकाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Hair Oil : केस मुळापासून होतील स्ट्राँग, नियमित करा या तेलाचा वापर

Raj Thackeray On Satyacha Morcha Mumbai: आधी नावं वाचली, नंतर माणसं उभी केली!” – ,सत्याच्या मोर्चात राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर घणाघात|VIDEO

PAN Card Linking: हे काम केलं नाही तर... १ जानेवारीपासून पॅनकार्ड वापरता येणार नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Earphones Side Effects : तासनतास इअरफोन कानाला लावताय? वेळीच सावध व्हा! होईल मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT