शेअर मार्केटमध्ये आज सकाळपासूनच मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सलग सहाव्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री झाली आहे. सेन्सेक्स ८०.३०० च्या खाली आला आहे. सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये १.३० टक्क्यांनी घट झाली आहे.
निफ्टी50 मध्येही घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी २७८ अंकांनी घसरुन २४,२७० वर व्यापार करत आहे.तर निफ्टी बँक ७८३ अंकांनी घसरले असून ५२५३२ वर व्यव्हार करत आहे. (Share Market Crash Today)
BSE मध्ये ३० पैकी २९ शेअर्स घसरले पाहाला मिळत आहे. केवळ १ शेअर वाढला आहे तोदेखील केवळ १ टक्क्यांनी वाढला आहे. भारती एअरटेलचे शेअर्स १ टक्क्यांनी वाढले आहे. आज टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळले. तर रिलायन्सचे शेअर्स १.३३ टक्क्यांनी घसरले आहे.
एसबीआय, एचडीएफसी, आयटीसीच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांनी घसरण झाली आहे. NSE 50 मध्ये फक्त ३ शेअर्स तेजीत व्यव्हार करत आहे. ४७ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक घसरण झालेले शेअर्स (Shares)
ग्लेनमार्क फार्मा- ५ टक्क्यांनी घसरण
ज्युपिटर वॅगन शेअर्स- ४ टक्क्यांनी घसरण
सेलचे शेअर्स- ५ टक्क्यांनी घसरण
NMDC शेअर्स- ४ टक्क्यांनी घसरणे
ओव्हरसीज बँक शेअर-४.३० टक्क्यांनी घसरण
IRFC शेअर्स- ४ टक्क्यांनी घसरण
यूनियन बँक-३.५० टक्के घसरण
याचसोबत कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आज BSE मार्केट कॅपवर ६ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर BSE मार्केट कॅपमध्येही घसरण झालेली आहे.
शेअर बाजारातील ही घसरण जागतिक मार्केटसाठीही चांगली नाही. रिलायन्स आणि टाटा कंपनीचे शेअर्सदेखील घसरले आहे. चीनने आर्थिक बजेट जाहीर केल्यानंतर परदेशातील गुंतवणूकदारांचा कल चीनकडे वाढत आहे. (Share Market today)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.