Top 5 Shares : नेहमी अप्पर सर्किटवर राहणारे 5 शेअर्स; 2रुपये खर्चून श्रीमंत झाले गुंतवणूकदार

Share Market Tips : 5 शेअर्स असे आहेत, जे अनेक महिन्यांपासून सतत अप्पर सर्किटवर आहेत. या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल होतायेत.
Top 5 Shares
Share Market Google
Published On

तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्हाला मालामाल बनवू शकते. शेअर बाजारात काही पेनी स्टॉक्स आहेत, जे अनेक महिन्यांपासून सतत अप्पर सर्किटला गेले आहेत. या शेअर्सवर मार्केट खाली येण्याचा काही परिणाम होत नाही. नेहमी अप्पर सर्किटला जात असल्याने हे शेअर्स कोणीच विकण्यास तयार नाहीये. दरम्यान आपण अशा पाच शेअर्सबाबत माहिती घेणार आहोत जे गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. तर काहींनी अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवलंय.

अप्पर सर्किटला जाणारे शेअर्स

श्री अधिकारी ब्रदर्स -

हा असा स्टॉक आहे, या शेअरने गेल्या एका वर्षातील परताव्याच्या सर्व विक्रम मोडीत काढलेत. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये फक्त 20 हजार रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. एका वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत 41 रुपये होती तर आता त्याची किंमत 2175 रुपये झाली आहे. या स्टॉकमध्ये दररोज 2 टक्के अप्पर सर्किट होत आहे. तरीही या भावात कोणी विकायला तयार नाहीये.

एपिक एनर्जी

या शेअरवर बाजारभावाचा कोणताही परिणाम होत नाही. हे शेअर्स सतत 8 महिन्यापासून अप्पर सर्किटवर आहेत आणि कोणीही ते विकायला तयार नाहीत. या शेअरने 100, 200 नाही तर 1300 टक्क्यांपेक्षा जास्त मोबदला गुंतवणूकदारांना दिलाय. सात महिन्यांमध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना देणाऱ्या मोबदल्यात अनेकपटीने वाढ केलीय.

Top 5 Shares
Share Market : सेन्सेक्सची १३०० अंकांनी उसळी, टॉप १० शेअर्स कोणते? शेअर बाजारात अचानक तेजी कशी आली?

BITS -

असाच एक शेअर म्हणजे BITS, या शेअरने गुंतवणूकदारांनी अवघे दोन रुपयांची गुंतवणूक केली. 2 रुपये किमतीने श्रीमंत केले आहे. काही महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 2 रुपये होती आणि आज ती 50 रुपयांच्या जवळ पोहोचलीय. या शेअर्समध्ये दररोज अप्पर सर्किट होताना दिसतेय.

RHFL –

अनिल अंबानींची कंपनी RHFL म्हणजेच रिलायन्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड देखील रोजच्या वरच्या सर्किटवर आहे. यामुळे गुंतवणूकदारही अल्पावधीतच श्रीमंत झालेत.

Top 5 Shares
Share Market : शेअर बाजारात जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची झाली चांदी, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर? वाचा

Elitecon International

हे शेअर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. यात मागील काही वेळापासून 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किमत 11 रुपये होती. आता ये शेअर्सची किमत 78.63 आहे म्हणजेच एका वर्षात या शेअर्सने 600 टक्क्यांपेक्षा जास्त मोबदला दिलाय.

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. येथे आम्ही तुम्हाला फक्त स्टॉकबद्दल माहिती दिली आहे, हा खरेदीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com