share market today  Saam tv
बिझनेस

Share Market Today : शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, कोणते शेअर्स ठरले टॉप लूजर्स?

Share Market Today update : आज शेअर बाजारात भूकंप झाला. शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी कोसळले. आज बुधवारी काही शेअर्स कोसळल्याची घटना घडला आहे.

Vishal Gangurde

भारतीय शेअर बाजारात सहाव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांची शेअर विक्री आणि जगावरील युद्धाच्या सावटामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्सने १२२.५२ अंकांनी म्हणजे ०.१६ टक्क्यांनी घसरून ७६.१७१.०८ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी २६.५५ अंकांनी म्हणजे ०.१२ टक्क्यांनी घसरून २३,०४५.२५ वर पोहोचला.

आज व्यवहारात सेन्सेक्स ९०५.२१ अंकांनी घसरून ७५,३८८.३९ च्या निचांकी स्तरावर पोहाचला. परंतु शेवटच्या काही तासांत झालेल्या खरेदी विक्रीमुळे थोडीफार सुधारणा झाली. निफ्टी देखील २७३.४५ अंकांनी घसरून बंद झाला.

मागील सहा दिवसांत २,४१२ अंकांची घसरण

मागील सहा आठवड्यात सेन्सेक्समध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. ४ फेब्रुवारीपासून २,४१२.७३ अंकांची घसरण झाली. तर निफ्टी ६९४ अंक म्हणजे २.९२ टक्क्यांनी घसरला.

आज कोणते शेअर्स घसरले?

महिंद्रा अँड महिंद्रा

आयटीसी

पॉवर ग्रिड

रिलायन्स इंडस्ट्रीज

इंडसइंड बँक

अदानी पोर्ट्स

टायटन

इन्फोसिस

आज कोणते शेअर्स वधारले?

बजाज फिनसर्व्ह

टाटा स्टील

लार्सन अँड टूब्रो

अल्ट्राटेक सीमेंट

कोटक महिंद्रा बँक

टाटा मोटर्स

मंगळवारी परदेशी गुंतवणूदारांनी ४,४८६.४१ रुपयांच्या शेअरची विक्री केली. यामळे शेअर बाजारावर दबाव पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT