Share Market Saam tv
बिझनेस

Share Market Today : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दणका; निफ्टी-सेन्सेक्समध्ये पडझड, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

Share Market Update : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दणका बसला आहे. निफ्टी-सेन्सेक्समध्ये पडझड पाहायला मिळाली. आज कोणते शेअर्स टॉप गेनर्स ठरले, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्येही 350 अंकांची पडझड झाली. मुख्यता आयटी आणि बँकिंग शेअर्सच्या घसरणीचा बाजारावर प्रभाव राहिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. 2 एप्रिलपासून अमेरिका अनेक देशांवर आयात शुल्क धोरण लागू करणार आहे.

सेन्सेक्स आता ७६०२४ पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टी २३,१६५ वर स्थिरावला आहे. बीएसई मार्केट कॅपिटलाइजेशनमध्ये ३ लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे. बीएसईच्या टॉप ३० शेअरपैकी २ शेअरमध्ये घसरण झाली. तर तीन शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. इंडसलंड बँकेच्या शेअरने ५ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. HDFC Bank Shareच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण दिसली. Sunpharama, HCL Tech, Infosys आणि Bajaj Finserv चे शेअर ३ टक्क्यांहून अधिक घसरले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून जगभरात अनेक देशात रेसिप्रोकल टॅरिफ (Reciprocal Tariff) लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जगासहित भारतातील शेअर बाजारामध्ये भीती आहे. ट्रम्प यांनी या दिवसाला अमेरिकेचा 'मुक्ती दिवस' असल्याचं म्हटलंय.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने उसळी घेतल्याने शेअर बाजारात नकारात्मक परिणाम झाला. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत १.५१ टक्क्यांनी वाढून ७४.७४ डॉलर प्रती बॅरेल झालाय. भारताची आयात शुल्क बिलामुळे चिंता वाढली आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Redington चे शेअर ५.५८ टक्के, Neuland Labs चे ५.१३ टक्के, Amber Enterprises च्या शेअरमध्ये ४.५६ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. Voltas चे शेअर ७ टक्क्यांहून अधिक, पॉलिसी बाजार ४.८२ टक्के, Info Edgeचे शेअर ५.२५ टक्के आणि बजाज होल्डिंगचे शेअर ४.७१ टक्क्यांनी घसरले. पंजाब अँड सिंध बँकचे शेअर २० टक्क्यांचा लोअर सर्किट पाहायला मिळाला. यूको बँकेचे शेअर १२ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT