SEBI Saam Tv
बिझनेस

SEBI: सेबीची मोठी कारवाई! ८ कंपन्यांच्या १६ मालमत्तांचा होणार लिलाव; नेमकं काय आहे प्रकरण?

SEBI News: सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) काही कंपन्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ३० जानेवारीला सेबी विबग्योर ग्रुप ऑफ कंपनीज, पेलॉन ग्रुप ऑफ कंपनीजसह ८ कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

SEBI Auction 16 Properties Of 8 Companies:

सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) काही कंपन्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ३० जानेवारीला सेबी विबग्योर ग्रुप ऑफ कंपनीज, पेलॉन ग्रुप ऑफ कंपनीजसह ८ कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. (Latest News)

गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे गोळा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सेबीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सेबी कोलकाता वेअर इंडस्ट्रीज, टॉवर इन्फोटेक ग्रुप, जीबीसी इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन ग्रुप, टीचर्स वेल्फेअर क्रेडिट अँड होल्डिंग ग्रुप, हॅनिमन हर्बल ग्रुप आणि अॅनेक्स इन्फ्रास्ट्रक्चर इंडिय लि. या कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे.

कोलकत्ता उच्च न्यायालयाने ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आदेशानुसार, सेबीने कंपन्यांच्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या संपत्तीचे लिक्विडेशन आणि गुंतवणूकदारांना पेमेंट करण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे.

कोणत्या मालमत्तेचा लिलाव होणार?

सेबीच्या नोटीसनुसार, मालमत्तेमध्ये पश्चिम बंगालमधील जमीन, अपार्टमेंटचा समावेश आहे. या प्रॉपर्टीचा लिलाव ४७.७५ कोटी रुपयांच्या किंमतीती होणार आहे. ३० जानेवारीला ११ ते १ कालावधीत ऑनलाइन लिलाव होणार असल्याचे सेबीने सांगितले आहे. यामध्ये ८ कंपन्यांच्या जवळपास १६ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांनी नियमांचे पालन न करता गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT