SBI vs Post Office RD Saam Tv
बिझनेस

SBI vs Post Office RD : बँक की, पोस्ट ऑफिस गुंतवणूकीसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? अधिक रिटर्न्स कुठून मिळेल?

कोमल दामुद्रे

RD Calculator : वाढत्या महागाईत घरखर्च सांभाळून पैसे वाचवणे खरेतर कठीणच. परंतु पैसे योग्य प्रकारे गुंतवणूक न केल्यास भविष्यात आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही.

RD हा गुंतवणूक करण्याचा आणि बचतीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. आरडीमध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करता. ज्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या रकमेवर निश्चित व्याज दिले जाते. भारतातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसद्वारे आरडी सुविधा दिली जाते. अशावेळी भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) आणि पोस्ट ऑफिसने ऑफर केलेल्या RD योजनेबद्दल जाणून घेऊया.

1. एसबीआय आरडी योजना

SBI आपल्या ग्राहकांना 1 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी RD सुविधा देते. सध्या सर्वसामान्यांना ६.५ ते ७ टक्के आणि वृद्धांना ७ टक्के ते ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हा व्याजदर १५ फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे. SBI आपल्या ग्राहकांना 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के दराने व्याजाचा लाभ देते.

त्याचबरोबर 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के आणि वृद्धांना 7.50 टक्के दराने व्याज (Interest) दिले जात आहे. त्याच वेळी, 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीसाठी, 6.50 टक्के आणि वृद्धांसाठी, 7 टक्के व्याज उपलब्ध आहे. तर 5 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर SBI सामान्य नागरिकांना 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देते.

2. पोस्ट ऑफिस आरडी योजना

पोस्ट ऑफिस (Post Office) आरडी योजना ही 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. यामध्ये आपण किमान १०० रुपये गुंतवू शकतो परंतु, यातून अतिरिक्त व्याजाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळत नाही. पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के दराने व्याज मिळते. तसेच या व्याजदरावर टीडीएसही कापला जातो. यावर १० टक्के दराने टीडीएस कापला जातो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीमवर भरलेली रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT