SBI Scheme Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

SBI Sarvottam Term Deposit Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजनेत सर्वात जास्त व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला फक्त १ किंवा २ वर्षात गुंतवणूक करायची असते.

Siddhi Hande

आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बँकेच्या एफडी, सरकारी योजना किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास लोक प्राधान्य देतात. त्या योजनांमध्ये परताव्याची हमी असते. त्याच योजनेत लोक गुंतवणूक करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोत्तम टर्म डिपॉझिट या योजनेतही तुम्हाला भरघोस परतावा मिळतो.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोत्तम एफडीवर ग्राहकांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी ७.४ टक्के व्याज मिळते तर १ वर्षाच्या कालावधीसाठी ७.१० टक्के व्याजदर द्यावे लागणार आहे.

सर्वोत्तम एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्याज दिले जाते. सामान्य नागरिकांपेक्षा ५० बेसिस पॉइंट्सने जास्त व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना दिले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना २ वर्षांसाठी ७.९ टक्के व्याज दिले जाते तर एका वर्षासाठी ७.६ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्हाला फक्त १ किंवा दोन वर्षासाठी गुंतवणूक करता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत सर्वोत्तम व्याजदर दिले जाते. त्याचसोबत अवघ्या १ ते २ वर्षात तुमची एफडी मॅच्युअर होणार आहे. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीचे पैसे दोन वर्षात मिळणार आहे. दोन वर्षात गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT