SBI Recruitment 2026  latest update
बिझनेस

SBI Recruitment 2026 : नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये १५०० हून अधिक पदांवर बंपर भरती; पगार ऐकून थक्क व्हाल

SBI Clerk Recruitment 2026 : sbi ने ज्युनिअर असोसिएट पदांच्या 1,538 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रोसेस सुरू झालेली आहे. पात्रता वयोमर्यादा, शुल्क, पगार आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. याच तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क म्हणजेच ज्युनिअर असोसिएट पदांसाठी १५३८ जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

बँकने या भरतीसाठी अर्जाची प्रोसेस ७ ऑगस्टपासून सुरू केली आहे. तर २७ ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मात्र एससी, एसटी, पीडब्लूबीडी, माजी सैनिक आणि डीएक्सएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आलं आहे.

कोणत्या राज्यात किती जागा?

SBI च्या या भरतीमध्ये महाराष्ट्रात १६५, गुजरातमध्ये २८९, कर्नाटकमध्ये १२०, मध्य प्रदेशमध्ये १३४, झारखंडमध्ये १३३, आंध्र प्रदेशमध्ये ८८, राजस्थानमध्ये १०६ आणि ओडिशामध्ये १११ जागा आहेत. याशिवाय इतर राज्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पदवी पूर्ण केलेली असावी. अंतिम वर्ष किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.

वयोमर्यादा आणि पगार

उमेदवाराचे वय किमान २१ आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २४,०५० ते ६४,४८० रुपयांपर्यंत सॅलरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रिलिम्स परीक्षा, मेन्स परीक्षा आणि स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणीच्या माध्यमातून केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी SBI च्या अधिकृत अधिसूचनेतील पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Maharashtra News Live Update: विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अभिजित दिपकेंची मागणी

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT