SBI Data Leak  saam tv
बिझनेस

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

SBI Data Breach Claim: SBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकेच्या ३,८९७ ग्राहकांशी माहिती डार्क वेबवर आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

SBI Data Leak: देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या संभाव्य गळतीचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या प्राथमिक तपासात ३,८९७ ग्राहकांशी संबंधित माहिती डार्क वेबवर आढळल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, माहितीचा स्त्रोत आणि संभाव्य परिणाम शोधले जात आहेत.

कोणती माहिती लीक झाल्याचं समोर आलं?

उपलब्ध माहितीनुसार, डार्क वेबवर आढळलेल्या नोंदींमध्ये ग्राहकांची नावं, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल आयडी, घराचा पत्ता, बँक शाखेची माहिती तसेच काही ग्राहक ओळख क्रमांक आणि कर्जाशी संबंधित नोंदींचा समावेश असल्याचं सांगितले जातं.

बँकेला १६ ऑक्टोबर रोजी डिफेन्स सायबर एजन्सी (DCyA) आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांच्याकडून संभाव्य डेटा गळतीबाबत माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. मात्र, समोर आलेल्या सर्व नोंदींची सत्यता आणि माहिती नेमकी कुठून आली, याची पडताळणी अजून महत्त्वाची आहे.

३.७५ लाख ग्राहकांचा डेटा चोरीला गेल्याचा दावा

बँकेने याआधी Siriusim नावाच्या हॅकर समूहाने BreachForums या प्लॅटफॉर्मवर SBI च्या ३.७५ लाख ग्राहकांचा डेटा मिळवल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. पण हा दावा आणि बँकेच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेल्या ३,८९७ ग्राहकांच्या नोंदी हे वेगनवेगळे आकडे आहेत. मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी झाल्याच्या दाव्याची स्वातंत्र्य खात्री झालेली नाही.

SBI च्या बँकिंग सेवांवर परिणाम झाला का?

बँकेच्या माहितीनुसार, या घटनेमुळे मुख्य बँकिंग सेवा किंवा आर्थिक कामकाजावर मोठा परिणाम झालेला नाही. संभाव्य नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी सुरक्षा उपाय लागू करण्यात आले असून, तपास सुरू आहे.

SBI ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

  1. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  2. OTP, ATM PIN, पासवर्ड किंवा UPI PIN कोणालाही सांगू नका.

  3. SBI अधिकारी असल्याचे सांगून माहिती मागणाऱ्या संशयास्पद कॉल किंवा संदेशांपासून सावध राहा.

  4. खात्यातील व्यवहार नियमित तपासा आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.

वैयक्तिक माहिती लीक झाल्याची शक्यता म्हणजे बँक खात्यातले पैसे चोरीला गेलेच, असं नाही. मात्र, अशा माहितीचा वापर करून फसवणुकीचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे सावध राहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

CJP Protest: 'तुम्ही जनरेशन झेड नाहीत...', आशुतोष रांका आणि सौरव दासला हायकोर्टने फटकारले; सीजेपी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Jowar vs Bajra vs Ragi: ज्वारी, बाजरी की नाचणी? कोणत्या पिठात किती कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन; जाणून घ्या फरक

SCROLL FOR NEXT