Bank Strike Saam Tv
बिझनेस

SBI Bank Strike: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! सलग ६ दिवस बँक राहणार बंद; कारण काय?

SBI Bank Strike for 6 Days: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग ६ दिवस स्टेट बँक ऑफ इंडिया बंद राहणार आहे. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची हाक दिली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

सलग ६ दिवस बँका राहणार बंद

स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील कोट्यवधि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सलग ६ दिवस बंद राहणार आहे. कर्मचारी संघटना २५ आणि २६ मे रोजी संपावर जाणार आहेत. त्यामुळे दोन दिवस बंद असणार आहेत.

२५ मे रोजी सोमवार आहे. २६ मे रोजी मंगळवार आहे. त्याआधी २३ आणि २४ मे रोजी शनिवार रविवारी वीकेंडमुळे सुट्टी असणार आहे. यानंतर लगेचच २७ आणि २८ मे रोजी बकरी ईदमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. असं एकूण ६ दिवस बँका बंद असणार आहेत.

स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. संप झाल्यास सलग ६ दिवस दिवस बँका बंद असणार आहे. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर त्याआधी बँक सुरु आहे की नाही हे चेक करा.

स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संप का?

स्टेट बँकेचे कर्मचारी २५ आणि २६ मे रोजी संपावर जाणार आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने(AISBISF) या संपाची हाक दिली आहे. फेडरेशनच्या म्हणण्यांनुसार, कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष होत आहे. अनेक करारांची अंबलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच हा संप करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

फेडरेशनने बँक व्यवस्थापनासमोर १६ मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये भरती, निवृत्तीवेतन, पदोन्नती आणि कामाच्या सुविधांचा समावेश आहे. युनियनचे म्हणणे आहे की सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून थांबली आहे. त्यामुळे भरतीबाबतच्या प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT