Amrut Kalash Yojana Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: SBI ची ४०० दिवसांची धासू योजना! गुंतवणूकीवर मिळणार भरघोस व्याज

SBI Amrut Kalash Yojana: स्टेट बँकेची अमृत कलश योजना ही ४०० दिवसांची आहे. या योजनेत तुम्हाला भरघोस व्याज मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची हवी. विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर एका ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला पैसे मिळतात. अनेक योजनांमध्ये तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला काही ठरावीक रक्कम मिळते. स्टेट बँकेच्या अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. (SBI Amrut Kalash scheme)

स्टेट बँकेची अमृत कलश योजना ही ४०० दिवसांची आहे. या योजनेत तुम्ही आता ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूकीवर भरघोस परतावा मिळतो.

स्टेट बँकेच अमृत कलश योजना ही ४०० दिवसांची योजना आहे. या योजनेत ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अजूनच फायदा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर दिले जाणार आहे.

जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक करतात तर तुम्हाला ७१०० रुपये व्याज मिळते. या योजनेत वरिष्ठ नागरिकांना ७६०० रुपयांचे व्याज मिळते. ही योजना ४०० दिवसांमध्ये मॅच्युअर होते.या योजनेत जर तुम्ही १० लाख रुपये गुंतवतात तर तुम्हाला वर्षाला ७१००० रुपये व्याजदर मिळतात.

अमृत कलश योजनेत तुम्हाला महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याच्या आधारावर व्याज मिळते. या स्पेशल एफडी योजनेत मॅच्युरिटी व्याज आणि टीडीएस कापून पैसे जमा केले जातात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. (SBI Amrut Kalash Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT