SBI Fixed Deposit Scheme Saam TV
बिझनेस

SBI Best FD Schemes: एसबीआयच्या या दोन FD योजना आहेत जबरदस्त, गुंतवणुकीवर इतका मिळतो व्याजदर

Investment Schemes: एसबीआयच्या या दोन FD योजना आहेत जबरदस्त, गुंतवणुकीवर इतका मिळतो व्याजदर

Satish Kengar

SBI Best FD Schemes: देशातील बहुतेक लोक अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात जिथे त्यांना कोणत्याही प्रकारची बाजारातील जोखीम नसते. सरकारच्या लहान बचत योजना आणि बँकांच्या एफडी योजना हे गुंतवणुकीसाठी बहुतेक लोकांचे पहिले प्राधान्य असण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यातच विविध सरकारी लहान बचत योजना आणि विविध बँकांच्या एफडी योजनांवर उपलब्ध व्याजदर देखील भिन्न आहेत.

त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो. अशातच आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन जबरदस्त एफडी योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.

एसबीआयच्या दोन सर्वात लोकप्रिय FD योजना SBI We Care आणि एसबीआय अमृत कलश योजना आहेत.  (Latest Marathi News)

SBI We Care

SBI We Care FD योजना खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिक त्यांची एफडी योजना 5 ते 10 वर्षांसाठी करू शकतात. सध्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 7.50 टक्के व्याज मिळत आहे.

एसबीआय अमृत कलश

दुसरीकडे, जर आपण एसबीआयच्या अमृत कलश योजनेबद्दल बोललो, तर सामान्य गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करण्यावर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळत आहे.

एसबीआय अमृत कलश FD योजना फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचा विचार करत असाल. तर या दोन योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT