SBI Scheme Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! मिळणार भरघोस परतावा; गुंतवणुकीसाठी उरले फक्त ४ दिवस

SBI Amrut Kalash Scheme: स्टेट बँकेने अमृत कलश योजना सुरु केली आहे. या योजनेत फक्त ४०० दिवसांसाठी तुम्हाला गुंतवणूक करायच आहे. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळते.

Siddhi Hande

जर तुम्हाला कमीत कमी दिवसांत जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करुन ४०० दिवसांत जबरदस्त परतावा मिळवू शकतात. स्टेट बँकेच्या या योजनेत कमीत कमी दिवसांत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूकीसाठी आता शेवटचे ४ दिवस उरले आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

स्टेट बँकेची ही योजना एकदम सुरक्षित आहे. या योजनेत गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक करा.

अमृत कलश ही आतापर्यंतची सर्वात कमी कालावधीची योजना आहे. यात तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. जर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत गुंतवणूकीची शेवटची तारीख वारंवार बदलली आहेत. दरम्यान, आता तुम्ही ३१ तारखेपर्यंत गुंतवणूक करु शकतात.

या योजनेत महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याला व्याज मिळते. हे व्याज थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाते. या योजनेचा लाभ NRI देखील घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त बँकेच्या अॅपवर जाऊन योजनेसाठी रजिस्टर करायचे आहे. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर पसे मिळणार आहे. ४०० दिवसानंतर म्हणजे जवळपास वर्षभरात तुम्हाला भरघोस परतावा मिळणार आहे.

जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर ४०० दिवसानंतर तुम्हाला १४२०० रुपये परतावा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT