PPF Investment Benefits saam tv
बिझनेस

PPF investment benefits: दररोज फक्त १०० रूपये गुंतवा अन् १० लाख मिळवा, सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल

PPF: पीपीएफ योजनेत ७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याव्यतिरिक्त गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहतात. या सरकारी योजनेतून दररोज फक्त १०० रूपयांची बचत केली तर या गुंतवणूकीतून आपण १० लाख रूपये उभे करू शकता.

Bhagyashree Kamble

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम सेव्हिंग करायची असते आणि ती अशा ठिकाणी गुंतवायची असते, जिथून मजबूत परतावा तसेच पैसेही सुरक्षित राहतील. जर आपल्याला गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात उत्तम परतावा हवा असेल, तर पीपीएफ योजनेत आपण पैसे गुंतवू शकता. या योजनेत ७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याव्यतिरिक्त गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. या सरकारी योजनेतून दररोज फक्त १०० रूपयांची बचत केली तर, या गुंतवणूकीतून आपण १० लाख रूपये उभे करू शकता.

१५ वर्षानंतर मॅच्युरिटी आणि कंपाऊंडिंगचा लाभ

गुंतवणूकीच्या बाबतीत अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत. ज्या उत्कृष्ट परतावा देत आहेत. यापैकी बहुतांश योजनेत काही जोखीम घटक देखील असतात. पण पीपीएफ गुंतवणूकीत जोखीम नसते. कारण ही योजना सरकारी आहे आणि सरकार स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे पैसे सुरक्षित ठेवतात. हे खाते १५ वर्षात मॅच्युअर होते.

जर गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर, तो आणखीन कालावधी वाढवू शकतो. ही योजना जनसामान्यात आणखी एका कारणामुळे हीट आहे आणि ते कारण म्हणजे पीपीएफमधील गुंतवणुकीवर परतावा चक्रवाढ व्याजानुसार दिला जातो.

१० लाख रूपये कमावण्याचा हिशोब

१० लाख कमावण्यासाठी आपल्याला दररोज १०० रूपये गुंतवावे लागतील. १०० रूपये रोजची बचत करून आपण दरमहा ३००० रूपये बचत करू शकता. वर्षभरात ३६,००० हजार रूपयांची बचत होईल. त्यानुसार १५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत गुंतवणूक केली तर एकूण ९,७६,३७० रूपयांची बचत होईल. यात तुमची गुंतवणूक ५.४० लाख रूपयांची असेल आणि सरकारकडून ४,३६,३७० रूपये व्याज मिळेल.

आता तुम्ही तुमची पीपीएफ गुंतवणूक मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर वाढवू शकता. जर ही गुंतवणूक आणखी ५ वर्षांसाठी वाढवली तर, दुप्पट फायदा मिळेल. त्यामुळे ही योजना नक्कीच आर्थिकदृष्ट्या आपल्याला पुढील काळात मदत करेल आणि गुंतवणूकीचे पैसेही सुरक्षित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT