आपल्या देशात अनेक प्रकारच्या सरकारी योजना सुरु असतात. सरकारी योजना सर्व नागरिकांसाठी फायदेशीर असल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. याबरोबर काही नागरिक पैश्यांची योग्यरित्या गुंतवणूक व्हावी आणि त्याबदलेत योग्य रक्कम मिळावी म्हणून देशभरात वेगवेगळ्या योजना शोधत असतात. म्हणून आज तुम्हाला अशा काही सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे नागरिकांचे पैसे दुप्पट होऊ शकतात.
देशभरातील त्या योजनेचे नाव किसान विकास पत्र असे आहे. या योजनेमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपण अनेकदा पोस्ट ऑफिसमध्ये जात असतो. पोस्ट ऑफिस ही संस्था सर्वात जुनी असल्याने नागरिकांचा या संस्थेवर खूप विश्वास आहे. याबरोबर ही संस्था आपल्याला अनेक सुविधा पुरवत असते. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या स्किम देखील असतात. नागरिक देखील त्या स्किमचा फायदा घेतात. पण नागरिक काही अशा योजनेच्या शोधात असतात. ज्यामध्ये कमी किमतीसह त्यांना जास्त रक्कम मिळण्याचा फायदा होईल.
पोस्ट ऑफिसमधील किसान विकास पत्र योजना एक उत्तम योजना आहे. या योजनेमध्ये काही महिन्यांकरिता गुंतवणूक केल्यास आपल्याला दुप्पट पैसे मिळू शकता. यामुळे या योजनेचा लाभ सर्व नागरिक घेऊ शकता. आज तुम्हाला या बातमीमधून योजनेची पात्रता आणि अर्ज कसा करावा याबद्दल सांगणार आहोत.
नागरिक किसान विकास योजनेमध्ये १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. याबरोबर नागरिकांना या योजनेत एकत्र पैसे गुंतवावे लागतील. नागरिकांना योजनेसाठी ७.५ टक्के वार्षिक व्याज देण्यात येईल. नागरिक त्यांच्या इच्छेनुसार आपले किसान विकास योजनेचे खाते तीन व्यक्तींसोबत उघडू शकता. याबरोबर तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक ११५ महिन्यानंतर दुप्पट होईल.
अर्ज पात्रता
किसान विकास पत्र योजनेसाठी १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक पात्र ठरु शकतो. याबरोबर आई-वडील असणारे पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने देखील या योजनेचे खाते उघडू शकतात. नागरिकांना योजनेसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल. याबरोबर ते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये योग्य माहिती मिळवून अर्ज भरु शकता. किसान विकास पत्र योजनेसाठी नागरिकांना अर्ज भरताना आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे महत्त्वाची कागपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.