Samsung Galaxy M07 4G हा फोन भारतात लवकरच लाँच होणार आहे.
बजेट सेगमेंटमध्ये ८,००० ते ९,००० रुपयांच्या दरम्यान किंमत असू शकते.
फोनमध्ये ५०MP ड्युअल कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळणार आहे.
90Hz डिस्प्ले आणि Android 15 ऑपरेटिंग सिस्टमसह हा फोन येण्याची शक्यता आहे.
सॅमसंगने बजेट सेगमेंटमध्ये आपली गॅलेक्सी एम-सीरिज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय केली आहे. यावर्षी मार्च महिन्यात कंपनीने Galaxy M06 5G भारतात लाँच केला होता. आता कंपनी आणखी एक स्वस्त मॉडेल घेऊन येण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy M07 4G असणार आहे. याबाबतच्या काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स आणि किंमत ऑनलाइन समोर आली आहे.
लीक्सनुसार, Galaxy M07 4G ची भारतातील किंमत ८,००० ते ९,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. ही किंमत Galaxy M06 5G च्या तुलनेत थोडीशी कमी आहे. Galaxy M06 5G भारतात ४GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंट ९,४९९ रुपयांना तर ६GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंट १०,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy M07 4G मध्ये ६.७ इंचाचा एचडी+ LCD डिस्प्ले, ७२०x१,६०० पिक्सेल रिझोल्यूशन, २६०ppi पिक्सेल डेन्सिटी आणि ९०Hz रिफ्रेश रेट असू शकतो. Samsung Galaxy M07 4G मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो, ज्यासोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेजची जोड मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android 15 वर चालण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग या डिव्हाइससाठी सहा पिढ्यांच्या अँड्रॉईड अपडेट्सचे आश्वासन देऊ शकते.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा सेकंडरी लेन्स असू शकतो. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी १०८०p रिझोल्यूशनपर्यंत सपोर्ट दिला जाऊ शकतो. बॅटरी विभागात ५,०००mAh क्षमतेची बॅटरी आणि २५W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
डिझाईनच्या दृष्टीने Samsung Galaxy M07 4G ला IP54 सर्टिफिकेशन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्याच्या किरकोळ शिंतोड्यांपासून सुरक्षित राहू शकतो. सुरक्षिततेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. बजेट फोन असूनही यात स्टीरिओ स्पीकर्स आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy M07 4G ची जाडी फक्त 7.6 मिमी असल्याचे समोर आले आहे, जी Galaxy M06 5G च्या तुलनेत किंचित कमी आहे.
जर ही माहिती खरी ठरली, तर सॅमसंग Galaxy M07 4G मध्ये Galaxy M06 5G प्रमाणेच डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी उपलब्ध असतील. मात्र यामध्ये प्रोसेसर आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये काही बदल करण्यात येऊ शकतात. त्यामुळे स्वस्त किमतीत हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि आकर्षक पर्याय ठरू शकतो.
Samsung Galaxy M07 4G कधी लाँच होणार आहे?
लाँच डेट अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही, परंतु हा फोन भारतात लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
Galaxy M07 4G ची भारतातील अपेक्षित किंमत किती असेल?
या फोनची किंमत अंदाजे ८,००० ते ९,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.
Galaxy M07 4G मध्ये कोणते फीचर्स मिळतील?
यात ६.७ इंचाचा ९०Hz डिस्प्ले, ५०MP ड्युअल रियर कॅमेरा, Android 15, MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी मिळू शकते.
Galaxy M07 4G मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे का?
होय, या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.