Samsung Galaxy F05 Launched in India 
बिझनेस

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

Bharat Jadhav

भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Samsung ने आज 17 सप्टेंबर रोजी एक नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनचं नाव Samsung Galaxy F05 असं आहे. सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या एफ सीरीजचा नवीन फोन आहे. हा स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्स असलेला मोबाईल आहे. या सॅमसंग फोनची विशेष बाब म्हणजे 50 एमपी कॅमेरा असलेला हा फोन कमी किमतीत मिळणार आहे.

Samsung ने Galaxy F05 फक्त एका 4GB RAM + 64GB स्टोरेज प्रकारात लॉन्च केलाय. फोनचे स्टोरेज 1TB स्टोरेज पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा फोन ट्वायलाइट ब्लू कलरमध्ये आणण्यात आलाय. Samsung Galaxy F05 स्मार्टफोन 20 सप्टेंबरपासून ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलेक्सी F05 फोन हा Flipkart, Samsung.com आणि काही निवडक रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

सॅमसंगच्या फोनला चांगल्या कॅमेऱ्यासह डिझाइन देण्यात आलीय. Galaxy F05 स्टायलिश लेदर पॅटर्न डिझाइनसह येणार असल्याने हा फोन प्रीमियम दिसतो. Galaxy F05 मध्ये 50MP ड्युअल कॅमेरे देण्यात आलेत. ज्यामुळे वापरकर्ते चांगले फोटो क्लिक करू शकतील. यासोबतच फोनमध्ये 2MP डेप्थ-सेन्सर कॅमेरा आहे. Galaxy F05 च्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय.

Galaxy F05 मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. Galaxy F05 मध्ये रॅम 8GB पर्यंत RAM आहे. युझर्सला स्टोरेज स्पेसबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण Galaxy F05 देखील 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. Samsung Galaxy F05 मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. Galaxy F05 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. हे ब्राउझिंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी योग्य आहे. अधिक शक्ती प्रदान करण्यासाठी Galaxy F05 25W जलद चार्जिंगला समर्थन देत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT