Samsung Galaxy S24 Ultra Saam Tv
बिझनेस

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

Satish Kengar

तुम्हीही नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्त खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सॅमसंगच्या वेबसाइटवर सुरू असलेल्या फॅब ग्रॅब फेस्ट सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे.

12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर 1,21,999 रुपये आहे. सेलमध्ये यावर 12,000 रुपयांची सूट मिळत आहे. ही सवलत जवळपास सर्व प्रमुख बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवर ग्राहकांना मिळणार आहे.

फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Samsung Axis Bank कार्ड वापरल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही हा फोन सॅमसंगच्या 70 टक्के खात्रीशीर बायबॅक योजनेअंतर्गत देखील खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 70 हजार रुपयांपर्यत कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 1440x3120 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8 डायनॅमिक LTPO AMOLED 2x डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल 2600 nits आहे. फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट पाहायला मिळेल.

फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे देत आहे. यामध्ये 10-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सरसह 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आणि OIS सपोर्टसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर समाविष्ट आहे.

फोनमध्ये सेल्फीसाठी तुम्हाला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देत ​​आहे. ही बॅटरी 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1.1 वर काम करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT