नवरात्रीच्या मुहूर्तावर कार उत्पादक कंपनी किया इंडियाने लक्झरी सेगमेंटमध्ये डबल धमाका केली आहे. कंपनीने आपल्या दोन जबरदस्त कार भारतातलॉन्च केल्या आहेत. Kia Carnival आणि Kia KV9 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. Carnival ची एक्स-शोरूम किंमत 63.90 लाख रुपये आहे. कंपनीने याची बुकिंगही सुरु केली आहे. ग्राहक कानोनिच्या डीलरशिपवर लाख रूपये टोकन रक्कम देऊन ही कार बुक करू शकतात.
यासोबत Kia ने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार KV9 देखील सादर केली आहे, ज्याची किंमत 1.29 कोटी रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही कार्स भारतात CBU म्हणून विकली जातील.
Kia EV9 मध्ये 99.8 kWh चा बॅटरी पॅक आहे. याची मोटर 384 PS ची पॉवर आणि 700 Nm टॉर्क जनरते करते. 0-100 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी फक्त या कारला फक्त 5.3 सेकंद लागतात. ही कार एका चार्जवर 561 किलोमीटरपर्यंत रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
Kia EV9 ची लांबी 5015 मिमी आहे, तर त्याची रुंदी 1980 मिमी, उंची 1780 मिमी आणि व्हीलबेस 3100 मिमी आहे. कारच्या ग्राउंड क्लीयरन्स 198 मिमी आहे. याच्या इंटीरियरमध्ये फक्त ब्राऊन आणि ब्लॅक कलरचा पर्याय उपलब्ध आहे. Kia KV9 स्नो व्हाइट पर्ल, पँटेरा मेटल, पेबल ग्रे, ओशन ब्लू आणि अरोरा ब्लॅक पर्ल या रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
न्यू जनरेशन कार्निव्हल एक लक्झरी एमपीव्ही आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत याच्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. ही कार आधी पेक्षा आता जास्त आकर्षक दिसते. यात टायगर नोज ग्रिल आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन जनरेशन कार्निव्हलमध्ये 215cc डिझेल इंजिन देण्यात आले आहे.
हे इंजिन 193PS चा पॉवरसह येतं. यात 2WD सह 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. विशेष बाब म्हणजे यात 72 लीटरची इंधन टाकी आहे. ड्रायव्हिंगसाठी यात इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्मार्ट मोड देण्यात आले आहेत. नवीन जनरेशन किया कार्निवलची लांबी 5155 मिमी आहे. याची एक्स-शोरूम किंमत 63.90 लाख रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.