Samsung  
बिझनेस

Samsung: क्या बात, क्या बात! मोबाईल तुटो किंवा फुटो तरी दुरुस्त करुन देणार कंपनी; Samsungची मोठी घोषणा

Samsung : दोन तीन दिवसापूर्वी स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने मोबाई विषयी मोठी घोषणा केलीय. मोबाईल युझर्स सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरत आहेत, त्यांचे खराब झालेले स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच वर्षातून दोनदा दुरुस्त करून घेऊ शकतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सॅमसंग कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा करत वर्षातून दोनदा कंपनीचे उपकरण दुरुस्ती करुन दिले जाणार आहे. दरम्यान उपकरणाच्या संरक्षणासाठी, कंपनीकडे आधीपासूनच Samsung Care+ प्रोग्राम आहे, जो कंपनीने आता विनामूल्य अपग्रेड केलाय.

या नव्या बदलाअंतर्गत वापरकर्ते त्यांचे डिव्हाइस वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकणार आहेत. यात मोबाईल युझर्स स्क्रीन संरक्षण आणि लिक्विड डॅमेज संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. Samsung Care+ हा Galaxy उपकरणांसाठी वेगळी एक स्कीम आहे.

यात मोबाईल वापरकर्त्यांना उपकरणाचा कोणत्याही घसाराशिवाय 100% सुरक्षा दिली जाणार आहे. यात वॉक-इन आणि पिक-अपची सुविधा मिळते म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही खराब झालेले उपकरण दुकानात नेणार त्याच दिवशी तुम्हाला दुरुस्ती करुन मिळेल. दरम्यान य ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकतात.

Samsung Care+ संदर्भात कंपनीने म्हटलं की, सॅमसंग उत्पादनांच्या दुरुस्तीसाठी अस्सल भाग वापरण्यात येतात. तसेच डिव्हाइसच्या कार्यक्षमतेसह कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. यामुळे तुमचे उपकरण अगदी नवीन उपकरणाप्रमाणे काम करते. दरम्यान Samsung Care+ प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 399 रुपये आहे, जी संपूर्ण Galaxy श्रेणी कव्हर करते. यामध्ये Galaxy Smartphone, Galaxy Tablet, Galaxy Watch, Galaxy Book यांचा समावेश आहे. तर Samsung Care+ मध्ये कोणत्याही अडचणीशिवाय उपलब्ध आहे, जो शून्य शुलकावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT