Samsung Grand Republic Day Sale Saam Tv
बिझनेस

Samsung च्या मोबाईलवर मिळत आहे तब्बल 57 टक्‍के सूट; अनेक स्‍मार्टफोन्‍स आणि टॅब्‍लेट्सवरही जबरदस्त ऑफर्स

Samsung Grand Republic Day Sale: सॅमसंगने ग्रॅण्‍ड रिपब्लिक डे सेलची केली घोषणा. या सेलमध्‍ये सॅमसंगची विविध उत्‍पादने जसे गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर बंपर ऑफर्स मिळेल.

साम टिव्ही ब्युरो

Samsung Grand Republic Day Sale:

सॅमसंगने आपल्या ग्रॅण्‍ड रिपब्लिक डे सेलच्‍या लॉन्चची घोषणा केली आहे. या सेलमध्‍ये सॅमसंगची विविध उत्‍पादने जसे गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, वीअरेबल्‍स, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक मिळेल. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहकांना एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि इतर आघाडीच्‍या बँक डेबिट व क्रेडिट कार्डसवर जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये) मिळेल.

या बोनान्‍झा सेलदरम्‍यान गॅलॅक्‍सी ए सिरीज, एम सिरीज, एफ सिरीज, एस सिरीजचे निवडक मॉडेल्‍स आणि गॅलॅक्‍सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५७ टक्‍के सूट मिळू शकते. ग्राहकांना नवीन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या प्री-बुकिंगवर अदभुत ऑफर्स देखील मिळतील. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रॅण्‍ड रिपब्लिक डे सेल अंतर्गत ग्राहक गॅलॅक्‍सी एस२३ फक्‍त ५४९९९ रूपयांमध्‍ये खरेदी करू शकतात. गॅलॅक्‍सी बुक गो, गॅलॅक्‍सी बुक३ आणि गॅलॅक्‍सी बुक ३ प्रो असे गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ४६ टक्‍के सूट मिळू शकते, तसेच गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्सचे निवडक मॉडेल्‍स, वीअरेबल्‍स व अॅक्‍सेसरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्‍के सूट मिळू शकते.  (Latest Marathi News)

सॅमसंग टेलिव्हिजन्‍सचे प्रिमिअम व लाइफस्‍टाइल मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास ४८ टक्‍के सूटसह जवळपास १५२५० रूपयांपर्यंतच्‍या अतिरिक्‍त एक्‍सचेंज लाभांचा आनंद घेऊ शकतात. निओ क्‍यूएलईडी आणि क्‍यूएलईडीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुढीलपैकी खात्रीदायी स्‍पेशल गिफ्ट मिळेल - १२४९९० रूपये किमतीचा गॅलॅक्‍सी एस२३ अल्‍ट्रा किंवा ६९९९० रूपये किमतीचा ५० इंच सेरिफ टीव्‍ही किंवा ३८९९० रूपये किमतीचा साऊंडबार (क्‍यू७००सी / सी४५०).

सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रेफ्रिजरेटर्सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ५२ टक्‍के सूट मिळेल. ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास १५१२५ रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे देखील मिळू शकतात.

२८ लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि ३२ लीटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४५ टक्‍के सूट मिळू शकते. फुली ऑटोमॅटिव्‍ह वॉशिंग मशिन्‍सच्‍या इकोबबलTM श्रेणीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राकांना जवळपास ४९ टक्‍के सूटसह अपग्रेड बोनस म्‍हणून ३००० रूपयांचा अतिरिक्‍त फायदा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT