व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर सादर करण्यासाठी सज्ज झालं आहे. या फीचरद्वारे अॅपमध्ये ओनरशिप ट्रान्सफर करण्याची युजर्सला परवानगी मिळणार आहे. हे फीचर Android बीटा व्हर्जन 2.24.2.17 मध्ये पाहायला मिळणार आहे. जे युजर्स त्यांच्या WhatsApp चॅनेलची ओनरशिप ट्रान्सफर करण्यास परवानगी देतं.
असं असलं तरी हे फीचर फक्त चॅनेल ओनरशिपसाठी आहे. याने तुम्ही ग्रुप किंवा पर्सनल अकाऊंटची ओनरशिप ट्रान्सफर करू शकणार नाही. सध्या हे फीचर डेव्हलप केलं जात आहे. जे भविष्यातील अपडेटसह सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सची अपडेटेड घेणार्या WABetaInfo वेबसाइटनुसार, ओनरशिप ट्रान्सफर फीचरची अद्याप टेस्ट सुरु आहे आणि सध्या फक्त बीटा टेस्टच्या निवडक ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. (Latest Marathi News)
या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे असेल त्याला तुमच्या चॅनलची ओनरशिप सहज ट्रान्सफर करू शकता. बीटा युजर्स चॅनलवर टॅप केल्यावर ओनरशिप ट्रान्सफर करण्याचा पर्याय मिळत असल्याचं सांगितलं आहे.
कसं वापरता येईल हे फीचर
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा युजर्स ओनरशिप ट्रान्सफरचा पर्याय निवडणार, तेव्हा त्यांना युजरचे नाव नाव इनपुट करण्यास सांगितले जाते. याशिवाय युजर्स कोणत्याही चॅनेलच्या अॅडमिनला काढून टाकण्याचा पर्याय देखील मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.