Rules Change In 1st February 2024 Saam Tv
बिझनेस

Rules Change In 1st February 2024: फेब्रुवारी महिन्यात IMPS, NPS आणि Fastag नियमांमध्ये होणार मोठे बदल, खिशाला बसणार कात्री?

कोमल दामुद्रे

Financial Rules :

लवकरच वर्षातील दुसरा महिना सुरु होईल. या महिन्यात बजेट देखील मांडले जाणार आहे. काही दिवसांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

अशातच बजेटसोबत (Budget) इतर अनेक मोठ्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. १ फेब्रुवारीपासून NPS पैसे काढणे, IMPS चे नवीन नियम, SBI गृह कर्ज, पंजाब आणि सिंध बँकेची विशेष FD, नवीन SGB हप्ता यासह 6 नियमांमध्ये बदल होणार आहेत. १ फेब्रुवारीपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल (Rules) जाणून घेऊया.

1. NPS मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

पेन्शन नियामक PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होतील. हा नवा नियम १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, NPS अकाउंटमध्ये (Account) एकूण जमा केलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

2. IMPS चा नवीन नियम

१ फेब्रुवारीपासून तुम्हाला कोणाताही लाभार्थी न जोडता बँक खात्यांमध्ये ५ लाख रुपये ट्रान्सफर करता येतील. नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने बँक खात्यातील व्यवहार अधिक जलद आणि अचूक करण्यासाठी लगेच पेमेंट सेवा सुरु केली आहे. NPCI नुसार तुम्ही फक्त प्राप्तकर्ता किंवा लाभार्थीचा फोन नंबर आणि बँक खात्याचे नाव टाकून पैसे पाठवू शकता.

3. एसबीआय होम लोन ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहक वास्तविक कार्ड दरापेक्षा 65 bps पर्यंत कमी गृहकर्ज सवलत घेऊ शकतात. प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्जावर सूट ही ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मिळेल. ही सूट फक्त फ्लेक्सिपे, एनआरआय, नॉन-सेलरी, प्रिव्हिलेज आणि स्वतःच्या गृहकर्जावर मिळेल. याचा लाभ १ फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहे.

4. पंजाब सिंध बँक स्पेशल एफडी

पंजाब अॅन्ड सिंध बँक (PSB)स्पेशल एफडी धनलक्ष्मी ४४४ डेज ची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. एफडीचे खाते उघडण्यासाठी पात्र असलेले निवासी भारतीय NRO/NRE ठेव खातेधारक PSB धन लक्ष्मी नावाची ही विशेष FD योजना उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.

5. फास्टॅग

केवायसीशिवाय फास्टॅग ३१ जानेवारीनंतर बँकांद्वारे निष्क्रिय केले जाईल. KYC शिवाय FASTags जारी केल्यानंतर NHAI ने हे पाऊल उचलेले आहे. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्याचा किंवा विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडण्याच्या वापरकर्त्याच्या या गोष्टीला रोखणे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी फेब्रुवारी महिना सुरु होण्यापूर्वी काम पूर्ण करा.

6. SGB चा नवीन हप्ता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)२०२३-२४ च्या वर्षात सॉवरेन गोल्ड बॉन्ड च्या अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे. याचा पुढील गुंतवणुकीचा टप्पा १२ फेब्रुवारीला सुरु होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT