१ ऑगस्टपासून पैशांसंबंधित अनेक नियमांत बदल
LPG गॅस, CNG-PNG गॅसच्या किंमतीत बदल
यूपीआयसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत
जुलै महिना संपत आला आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक मोठे बदल होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. पैशांसंबंधित नियमांमध्ये बदल केले जाणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस ते यूपीआयचा समावेश आहे. सर्व नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
क्रेडिट कार्डमध्ये बदल
जर तुमच्याकडे SBI Card असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या कार्डधारकांना मोठा झटका मिळार आहे. ११ ऑगस्टपासून एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मिळणारे फ्रि एअर अपघात इन्श्युरन्स कव्हर बंद करणार आहे. त्यामुळे त्यांना इन्श्युरन्स मिळणार नाहीये.
LPG गॅसच्या किंमती (LPG Gas Price)
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. १ जुलै रोजीदेखील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल झाला होता. आता १ ऑगस्ट रोजीदेखील गॅसच्या किंमती बदलणार आहे. या किंमती वाढतात की कमी होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
UPI नियमांमध्ये बदल (UPI Rule Change)
१ ऑगस्टपासून यूपीआयच्या नियमांत बदल केले जाणार आहे.
आता तुम्ही दिवसाला फक्त ५० वेळा बॅलेंस चेक करु शकतात.
मोबाईल नंबरवरुन लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये दिवसाला फक्त २५ वेळा बॅलेंस चेक करु शकतात.
Autopay ट्रान्झॅक्शन आता फक्त ३ वेळेच्या स्लॉटमध्ये प्रोसेस होणार आहे. सकाळी १० वाजताच्या आधी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९.३० नंतर तुमचे Autopay ट्रान्झॅक्शन होणार आहे.
तसेच फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचा स्टेट दिवसातून फक्त ३ वेळा चेक करु शकतात.
CNG, PNG च्या किंमतीत बदल (CNG,PNG Gas Price Change)
तेल कंपन्या दर महिन्याला सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल करतात. एप्रिलनंतर या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता सहा महिन्यांनी कदाचित CNG, PNG च्या दरात बदल होऊ शकतो.
बँकेच्या सुट्ट्या
रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बँका जवळपास १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद असणार आहेत.
ATF च्या किंमती
१ ऑगस्टपासून एयर टर्बाइन फ्लूल (ATF)च्या किंमतीतदेखील बदल होऊ शकतो. इंडियन ऑइल कंपन्या फक्त एलपीजी गॅस नव्हे तर ATF च्या किंमतीतही बदल करतात.
ऑगस्ट महिन्यात कोणते नियम बदलणार ?
एलपीजी गॅसच्या किंमती यूपीआय व्यवहार, क्रेडिट कार्ड इन्श्युरन्स, सीएनजी-पीएनजी दर यामध्ये बदल होणार आहेत.
UPI व्यवहारांमध्ये कोणते नवीन नियम लागू होतील?
दिवसाला केवळ ५० वेळा बॅलन्स चेक करता येईल. तसेच AutoPay च्या नियमांमध्येही बदल केले आहेत.
गॅस दर व इंधन दरात काय बदल अपेक्षित आहेत?
एलपीजी, सीएनजी, पीएनजी आणि एटीएफच्या (ATF) किंमती १ ऑगस्टपासून बदलण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये बँकांना किती सुट्ट्या आहेत?
रिझर्व्ह बँकेनुसार, ऑगस्ट महिन्यात १५ पेक्षा जास्त दिवस बँका बंद असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.