Royal Enfield Saam tv
बिझनेस

Royal Enfield Hunter 350 : 'रॉयल एनफील्ड'चा धमाका! मोठ्या बदलासह सर्वात स्वस्त बुलेट लाँच, किंमत फक्त...

Royal Enfield Hunter 350 News : मोठ्या बदलासह सर्वात स्वस्त बुलेट लाँच करण्यात आली आहे. 'रॉयल एनफील्ड'च्या सर्वात स्वस्त बुलेटविषयी जाणून घ्या.

Vishal Gangurde

रॉयल एनफील्ड कपंनीने बाजारात सर्वात स्वस्त बुलेट लाँच केली आहे. नव्या अंदाजासह Hunter 350 बुलेट लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या बुलेटमध्ये काही बदल केले आहेत. नवी स्टाइल आणि पेंट स्कीमसहित बुलेटच्या मूळ किंमतीत बदल केले आहेत. या बाईकची एक्स-शोरुम किंमत १.५० लाख रुपये आहे.

कंपनीने दिल्लीच्या हंटरहूड फेस्टिवलमध्ये बुलेट लाँच केली. बुलेटच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन हंटर ३५० बुलेट तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. रियो व्हाइट, टोकयो ब्लॅक, लंडन रेड या रंगात बुलेट उपलब्ध आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन फिचर्स उपलब्ध आहेत.

नव्या रंगाच्या पर्यायात कंपनीने बाईकची एर्गोनॉमी अपडेट केली आहे. या बाइकमध्ये नवीम सस्पेंशन सेटअप मिळत आहे. या व्यतिरिक्त बाईकमध्ये LED हेडलाइट, एक ट्रिपर पॉड आणि टाइप-C यूएसबी पोर्ट देखील देण्यात आला आहे. बाईकमध्ये कंपनीने ग्राऊंड क्लिरन्स 10 मिमीपर्यंत वाढवला आहे. रस्ता खडकाळ असला तरी बाईकने चांगली राईड करता येईल.

रॉयल एनफिल्ड हंटर ३५० इंजिन मॅकेनिज्ममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बाइकमध्ये आधीचं इंजिन मिळणार आहे. तसेच ३४९ सीसी क्षमता असणारं एअर/ऑइल-कूल्ड, जे-सीरीज इंजिन देण्यात आलं आहे. ५-स्पीड गियरबॉक्सहून कमी आहे. इंजिन २०.२ बीएचपी पॉवर आणि २७ न्यूटन मीटरचं पीक टॉर्क जनरेट करते.

हंटर ३५० ची अधिकृत बुकिंग सुरु झाली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत डिलरशिपकडून बाईक बुकिंग केली जात आहे. या बाईकची डिलीव्हरी लवकरच सुरु होणार आहे. या बाईकचे वेगवेगळे व्हेरिंएन्ट उपलब्ध आहेत. फॅक्ट्री ब्लॅक, रियो व्हाईट, डॅपर ग्रे, टोकयो ब्लॅक, लंडन रेड आणि रेबेल ब्लू सारख्या रंगाच्या बाईक बाजारात उपलब्ध आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत १,४९,९०० रुपयांना आहे. तर या बाईकच्या टॉप व्हेरिएन्टची किंमत १,८१,७५० रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT