Royal Enfield Himalayan 650 Saam Tv
बिझनेस

Royal Enfield लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ही दमदार बाईक; मिळणार अॅडव्हान्स फीचर्स

Royal Enfield Himalayan 650: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी भारतात लवकरच आपली नवीन Royal Enfield Himalayan 650 लॉन्च करणार आहे. याचबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे ही अपडेट, जाणून घ्या...

Satish Kengar

रॉयल एनफिल्ड बाईक्स आपल्या 350cc च्या पॉवरफुल इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीकडे अनेक हाय पॉवरट्रेन बाईक्स आहेत. या हाय पॉवर बाईक्सविशेषतः लांबच्या मार्गावर आणि पर्वतांवर धावण्यासाठी बनवल्या जातात. कंपनी 650 सीसी इंजिन पॉवर असलेल्या नवीन बाईकवर काम करत आहे. याची अनेक दिवसांपासून दुचाकीप्रेमी वाट पाहत आहेत. चला तर याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Royal Enfield Himalayan 650

या नवीन बाईकचे नाव Royal Enfield Himalayan 650 आहे. ही बाईक 650cc पॉवर इंजिनसह उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 25 kmpl पर्यंत मायलेज देईल. बाईकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. या बाईकचे एकूण वजन सुमारे 211 किलो असेल. त्यामुळे खराब रस्त्यावर ही बाईक सहज चालवता येईल.

Royal Enfield Himalayan 650 ला लांब मार्गांसाठी सुमारे 12 लिटरची मोठी इंधन टाकी मिळू शकते. या बाईकला पुढील बाजूस 21 इंच टायर आणि मागील बाजूस 19 इंच टायर देण्यात येणार आहेत. सध्या कंपनीने आपल्या नवीन बाईकची किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, ही बाईक 4 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत सादर केली जाईल. ही बाईक सप्टेंबर 2025 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. बाजारात ही बाईक KTM 390 Adventure, Moto Morini X-Cape आणि Benelli TRK 502 यांसारख्या बाईकशी स्पर्धा करेल.

Royal Enfield Himalayan 650 फीचर्स

या हेवी इंजिन बाईकमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. यात स्पोक व्हील उपलब्ध आहेत. याच्या दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात येतील. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टीएफटी स्क्रीन आहे. यात ट्यूबलेस टायर आणि ट्रॅक्शन कंट्रोल ग्राहकांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT