Royal Enfield Saam Tv
बिझनेस

आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचर्स.. Royal Enfield Classic 350 Bobber करणार मार्केट जाम!

Royal Enfield Classic 350 : साहसी बाइक राइड अनुभवण्यासाठी रॉयल एन्फिल्ड कंपनी ओळखली जाते. कंपनी लवकरच आपली रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Royal Enfield Classic 350 Bobber price Featutes And Specification:

साहसी बाइक राइड अनुभवण्यासाठी रॉयल एन्फिल्ड कंपनी ओळखली जाते. कंपनी नेहमीच बाइक चालवणाऱ्यांना चांगला अनुभव देण्यासाठी नवनवी बाईक लाँच करत असते. कंपनी लवकरच आपली रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक लाँच करणार आहे. ही बाईक चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे. (Latest News)

या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या नवीन बाइकची किंमत जवळपास २ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. बाईकमध्ये लांब हँडलबार आणि फ्लोटिंग रीअर सीट असू शकते. यातील मागील सीट सहज काढण्याजोगे (Removal Unit) असू शकते. या नवीन बाईकमध्ये विंटेज व्हाईट वॉल व्हिल्स, बाईकच्या उजव्या बाजूला हार्ड पॅनियर माउंट आणि इंजिन गार्ड हे फीचर्स असण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्डकडून अतिरिक्त किंमतीत क्रॅश गार्ड देण्याची शक्यता आहे.

इंजिन (Engine)

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350)मध्ये हंटर , मेटिअर आणि बुलेट सारखीच J सीरीज, 349cc सिंगल सिलेंडर मोटर वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणार आहे. जे 20.2bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते.

कंपनीच्या या नवीन कारच्या हार्डवेअरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल रिअर शॉक, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आणि रोड-बायस्ड टायर्ससह स्पोक व्हील देण्यात आले आहे. ही बाइक या वर्षात लाँच होण्याची शक्यता आहे.

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT