Bank FD Schemes Saam Tv
बिझनेस

Bank FD Schemes Updated (Aug 2023) : बँकेत एफडी करण्याचा विचार करताय? हीच ती योग्य वेळ!

Fixed Deposit Interest Rate : सध्या व्याजदर जास्त होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.

कोमल दामुद्रे

Bank FD Rate Interest (August 23):

प्रत्येकाला पैसे गुंतवण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पॉलिसीची गरज असते. त्यामुळे प्रत्येकजण नवनवीन एफडीमध्ये पैसे गुंतवत असतात. सध्या व्याजदर जास्त होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.

आरबीआय क्रेडिट पॉलिसीची बैठक नुकतीच पार पडली. यात बँकेने रेपो रेट ६.५ कायम ठेवला आहे. त्यामुळे बँकामध्ये ठेवलेल्या गोष्टींवर आता वाढीव व्याजदर मिळण्याच्या शक्यता कमी झाल्या आहेत. काही बँकांनी सेव्हिंग्सवर देण्यात आलेले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, बँकाकडून एफडीवर देण्यात येणारे व्याजदर खूप जास्त आहे. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

1. एफडीचे दर कसे मिळतात?

  • बँकामधील (Bank) एफडीवर व्याजदर रेपो रेटच्या आधारे ठरवले जातात. परंतु रेपो रेटच्या प्रमाणात एफडीचे प्रमाण वाढवलेले नाहीत.

  • कर्जांच्या मागणीचा दर जेव्हा जमा होणाऱ्या एफडीपेक्षा (FD) जास्त असतो तेव्हा बँका कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी एफडीचे दर वाढवत असतात.

2. एफडीवरील व्याजदर

  • एसबीआय ३ ते ७.१०%

  • एचडीएफसी ३ ते ७.२५%

  • आयसआयसीआय ३ ते ७.१०%

  • पीएनबी ३.५ ते ७.५%

  • कोटक महिंद्रा २.७५ ते ७.२०%

  • आरबीएल बॅंक ३.५ ते ७.८०%

  • येस बॅंक ३.२५ ते ७.७५ %

  • कॅनरा बॅंक ४ ते ७.३०%

  • आयडीएफसी ३.५ ते ७.७५%

3. १ ते ३ वर्षांची एफडी

  • सुरक्षित गुंतवणूकीवर निश्चित उत्पन्न हवे असेल तर लोकांनी १ ते ३ वर्षांसाठी एफडीमध्ये पैसे गुंतवावे.

  • मागच्या १५ महिन्यांच्या रेपो रेट २.५ टक्क्यांनी वाढल्याने व्याजदरही वाढले आहे. परंतु आता व्याजदर वाढण्याच्या शक्यता कमी आहेत.

  • एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वात चांगली संधी आहे. कमी दराच्या एफडीमध्ये पैसे (Money) गुंतवले असतील तर ती एफडी मोडून अधिक दराच्या एफडीमध्ये गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

SCROLL FOR NEXT