Success Story Saam Tv
बिझनेस

UPSC Success Story: ब्युटी विथ ब्रेन! दररोज १२-१३ तास अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात IAS; रिया डाबी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Ria Dabi: आयएएस रिया डाबी या आयएएस टीना डाबी यांच्या बहीण आहेत. या दोघींनीही यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्ती लागते. या परीक्षेत तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास होणार की नाही याबाबत शंका असते. परंतु कितीही अपयश आले तरीही प्रयत्न सोडायचे नाही. परंतु अनेकजण पहिल्याच प्रयत्नात खूप अभ्यास करुन यशस्वी होतात. असंच यश रिया डाबी यांना मिळालं आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आहे. त्यांची बहीण टीना डाबी यादेखील आयएएस ऑफिसर आहेत. या दोन्ही बहि‍णींचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

आयएएस रिया डाबी (IAS Ria Dabi)

आयएएस रिया डाबी यांनी लहानपणीच आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले होते. शाळेत असतानाच त्यांनी हे स्वप्न पाहिले होते. त्यांची मोठी बहीण यूपीएससी टॉपर होती. बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवून यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आयएएस रिया डाबी यांनी पहिल्याच प्रयत्नात १५वी रँक प्राप्त केली.

रिया डाबी यांचा प्रवास (Tina Dabi Sister Ria Dabi Success Story)

आयएएस रिया डाबी या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी जीसस अँड मेरी स्कूल दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे.

रिया डाबी या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना अभ्यासासोबत पेंटिंगची आवड आहे. याचसोबत त्यांना इंडियन फोक आर्टमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहेत.

रिया डाबी या रोज १२ ते १३ तास अभ्यास करायच्या. त्यांना पहिल्यापासूनच यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. या दोघी बहि‍णींना सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या दोघींचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT