Revolt RV1 Electric Saam Tv
बिझनेस

160km ची जबरदस्त रेंज, रिव्हर्स मोड, स्पोर्टी लूक; Revolt ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; किंमत किती?

Revolt RV1 Electric Bike: Revolt RV1 Electric Bike भारतात लॉन्च झाली आहे. याच बाईकच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

कमी बजेटमध्ये तुम्ही जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दुचाकी उत्पादक कंपनी Revolt ने आपली इलेक्ट्रिक बाईक RV1 भारतात लॉन्च केली आहे. ही बाईक RV1 आणि RV1+ या दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे.

बाईकला दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.2 kWh बॅटरी आणि 3.24 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही बॅटरी अनुक्रमे 100 किलोमीटर आणि 160 किलोमीटरची रेंज देतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

रिव्हॉल्ट मोटर्सची ही दुसरी इलेक्ट्रिक बाईक आहे, जी एंट्री लेव्हल सेगमेंटला लक्ष्य करते. दैनंदिन वापरासाठी या बाईक्स एक चांगला पर्याय ठरू शकतात. याच्याच फीचर्स आणि किंमतबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ….

किंमत आणि फीचर्स

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Revolt RV1 ची एक्स-शोरूम किंमत 84,990 रुपये आहे. तर RV1+ ची एक्स-शोरूम किंमत 99,990 रुपये आहे. ही बाईक तुम्हाला चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. याआधीही कंपनीने RV400 सारखी बाईक बाजारात आणली आहे.

RV1 हे कंपनीच्या RV400 चे अपग्रेड मॉडेल आहे. यात फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. ही बाईक 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल, तर रिव्हर्स मोड फीचरमुळे बाईक पार्क करणे सोपे होईल. या बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे, जो अनेक फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, बिल्ट-इन लेग गार्ड आणि सेंटर स्टँड सारखे फीचर्स यात उपलब्ध आहेत.

बाईकमध्ये 6 इंचाचा डिजिटल एलसीडी डिस्प्ले आहे. यात नवीन एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेल लाइट्स आहेत. बाईकमध्ये अनेक स्पीड मोड देखील दिलेले आहेत, त्यापैकी एक रिव्हर्स मोड आहे. त्यामुळे पार्किंग करणे सोपे होणार आहे. बाईकला रुंद टायर देण्यात आले आहेत, ज्यामुळे बाईक अधिक स्थिर राहते. चांगल्या ब्रेकिंगसाठी, बाईकला ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT