200 Rupees Saam Tv
बिझनेस

RBI Decision: २०० रुपयांच्या नोटा होणार चलनातून बाद? RBI ने तब्बल १३७ कोटी रुपयांच्या नोटा काढून टाकल्या

RBI Descision On 200 Rupees Notes Removal: आरबीआयने मागील सहा महिन्यात तब्बल १३७ कोटी रुपये मूल्य असलेल्या २०० रुपयांच्या नोटा काढून टाकल्या आहेत.

Siddhi Hande

RBI Descision On 200 Rupees Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या आहे. २००० रुपयांच्या नोटांनंतर आता २०० रुपयांच्या नोटादेखील चलनातून काढल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १३७ कोटी रुपये किंमतीच्या २०० रुपयांच्या नोटा काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील ६ महिन्यात या नोटा काढून टाकल्या आहेत. त्यामुळे आता २०० रुपयांच्या नोटादेखील चलनातून बाद होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिडिया वृ्तानुसार,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया २०० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या तयारीत नाही आहे.या नोटा काढून टाकण्याचे कारण म्हणजे २०० रुपयांच्या अनेक नोटा खराब झाल्या होत्या. खराब अवस्थेत असलेल्या नोटा काढून टाकण्यात आल्या आहेत. बँकेच्या मगील सहा महिन्याच्या रिपोर्टमध्ये १३७ कोटी रुपयांच्या २०० रुपयांच्या नोटा काढून टाकल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील वर्षा देखील १३५ कोटी रुपये मूल्य असलेल्या २०० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या होत्या. दरम्यान, खराब झालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक नोटा या काढून टाकल्या जातात. (200 Rupees Notes Removal)

मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात जास्त खराब नोटा या ५०० रुपयांच्या आहेत. मागील वर्षी तब्बल ६३३ कोटी रुपये मूल्य असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या होत्या. यातील काही नोटा फाटलेल्या होत्या. काही नोटांवरचे नंबर पुसले गेले होते. त्यामुळे या नोटा काढून टाकल्या होत्या.आरबीआयच्या रिपोर्टनुसार, ५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्यादेखील अनेक नोटा काढून टाकण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT