real estate risks Saam tv
बिझनेस

Explainer : स्वप्नाचं घर की कर्जात अडकलेले आयुष्य? बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी आर्थिक गणित समजून घ्या

real estate risks : बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी आर्थिक गणित समजून घेणे गरजेचे आहे. आर्थिक गणित समजून न घेता घर खरेदी केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागू शकतं.

Vishal Gangurde

घर खरेदी करणे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, काही जण घर खरेदी केल्यानंतर कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. समाजात स्वत:चं घर असणे प्रतिष्ठेचं मानलं जातं. तर भाड्याच्या घरात राहणे दुय्यम मानलं जातं. याचाच गैरफायदा घेऊन बिल्डर चांगला नफा कमावताना दिसतात. त्यामुळे बिल्डरकडून घर खरेदी करण्यापूर्वी आर्थिक गणित समजून घेणे गरजेचे आहे. कारण पुढे पश्चाताप होणार नाही.

भारतातील बहुतेक मध्यमवर्गीय कष्टाने जमा केलेल्या पैशांनी घर खरेदी करतात. त्यामुळे अनेक भावना या घरात अडकलेल्या असतात. बिल्डर आणि फ्लॅट विक्रेते याच भावनांचा वापर मार्केटिंगसाठी करतात. त्यामुळे घर खरेदी करताना भावनिक होऊन विचार करणे टाळले पाहिजे. फ्लॅट खरेदी करण्याआधी आर्थिक जोखीम समजून घ्यायला हवी.

'आजतक'शी बोलताना रियल एस्टेट एक्सपर्ट रवी सिन्हा यांनी म्हटलं की, 'बिल्डर काही प्रकल्प विक्रीसाठी खुले करतात. त्यावेळी काही बिल्डर घरे विक्री करताना ग्राहकांची दिशाभूल करतात. प्रकल्पात क्लब हाऊस, चांगल्या लाइफस्टाइलचं फसवं आश्वासन देतात. बिल्डर काही वेळा फ्लॅटचा ताबा ग्राहकांना देण्यासही विलंब करतात. ग्राहक फ्लॅट खरेदी करण्यासाठी संपूर्ण सेवा काळात जमा केलेली रक्कम बिल्डरच्या हातात सोपवत असतात. काही जण आर्थिक क्षमता नसताना प्रतिष्ठेसाठी मोठ्या क्षेत्रफळाची घरे खरेदी करतात. कारण असे ग्राहक बिल्डरच्या आश्वासनाला बळी पडलेले असतात'.

घर खरेदी करताना आर्थिक गणित समजून न घेतल्याने अनेक जण कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेलं घर अॅसेट न होता लायबिलिटी होते. उदा. तुम्ही एखादं सव्वा कोटींचं घर खरेदी केलं. तुमच्यावर एखादं संकट आलं, त्यावेळी तुम्ही घर विकायचं ठरवलं. त्यावेळी तुमच्या घराला ८० लाख रुपये देखील किंमत मिळत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही चुकीची गुंतवणूक केली होती.

अनेकदा दावा केला जातो की, तुम्ही भाडे भरण्यापेक्षा, स्वत:च्या घरासाठी ईएमआय भरा. परंतु हे अर्ध सत्य आहे. कारण घर खरेदी करताना तुम्ही घरासहित आर्थिक जोखीम देखील विकत घेत असतात. उदा. तुम्ही कर्ज काढून घर खरेदी केलं. काही वर्षांनी तुमची नोकरी गेली, तर तुमच्या 'स्वप्नाचं घराचं' रुपांतर मानसिक आणि आर्थिक ओझ्यामध्ये होते. त्यामुळे फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यासाठी आर्थिक जोखीम समजून घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT